राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजनासाठी शासन निर्णय जाहीर. जनजागृती मोहिम, पोलीस बंदोबस्त, विद्यार्थ्यांची झडती, महसूल विभागाची बैठी पथके, भरारी पथक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दौरे इत्यादी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता १२ वी ची परीक्षा दि.११.०२.२०२५ ते दि.१८.०३.२०२५ व इयत्ता १० वी ची परीक्षा दि.०२.०२.२०२५ ते १७.०३.२०२५ रोजी घेण्यात येणार आहेत. (डाउनलोड वेळापत्रक) या परिक्षांच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पुर्ण राज्यात "कॉपीमुक्त अभियान" राबविण्यात येणार आहे. सदरचे अभियान सर्व विभागांनी निवडणुक अभियानाप्रमाणे सामुहिकरित्या राबवणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या परीक्षेदरम्यान पुढीलप्रमाणे कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी.
१)राज्याचा नोडल अधिकारी म्हणून आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना व प्रत्येक जिल्हयातील जिल्हयाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच समन्वयक अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना नियुक्त करण्यात आले आहे, तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. सदर अभियान यशस्वीपणे राबविणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
२) यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन कॉपीमुक्त अभियान बाबत जनजागृती करावी.
३) परीक्षेच्या दरम्यान बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीसांनी परीक्षा कक्षामध्ये प्रवेश करुन नये. परीक्षा केंद्राच्या परीचीय भागामध्ये बंदोबस्ताचे काम पार पाडावे.
४) परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात.
५) संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रिकरण (Video) Shooting) करण्यात यावे..
६) जनजागृती मोहिम
- शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करणे.
- जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त करणे.
- माध्यमांव्दारे शाळा आणि पालकांशी संवाद साधावा.
6) पोलीस बंदोबस्त
- ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश नाही.
- अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात यावे.
- १९७३ च्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात यावेत.
- ५० मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत.
8) विद्यार्थ्यांची झडती
- १००% विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घ्यावी.
- पोलीस पाटील, कोतवाल, शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून मुलांची तपासणी करण्यात यावी. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी करावी.
9) महसूल विभागाची बैठी पथके
- पूर्णवेळ बैठे पथक नेमण्यात यावे.
- परीक्षेआधी १ तास ते परीक्षेनंतर १ तास [उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यता
- संवेदनशील परीक्षा केंद्रावर वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती ज्याचे मुळ गांव व कामाचे ठिकाण एकच असल्यास त्यांना त्याठिकाणी नियुक्ती देण्यात येऊ नये. दररोज बदल करण्यात यावा.
१०) भरारी पथक
- प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक.
- विभाग प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालय / जिल्हा परिषद
- अचानक तपासणीसाठी पोलीसांची उपस्थिती, झडती, बैठे पथक
११) जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दौरे
- इंग्रजी, गणित आणि विज्ञान पेपरसाठी दिवस राखीव ठेवणे.
- सकाळी तिघांचा आपसात विचारविमर्श आकस्मिक भेटी.
- प्रामुख्याने संवेदनशील तालुके आणि केंद्रांवर लक्ष
कॉपीमुक्त अभियान सप्ताह
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणेबाबत...
उपरोक्त विषयाबावत आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उन्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११/०२/२०२५ ते दि. १८/०३/२०२५ व माध्यमिक शालान्च प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१/०२/२०२५ ते दि. १७/०३/२०२५ या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
सदर दोन्ही परीक्षांना राज्यात्तून सुमारे ३१ लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून सदर परीक्षेत विविध मार्गानी निष्पन्न होणा-या वैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो त्यादृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपापल्या स्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबवित असतात, त्याअनुषंगाने
१) मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत, मा. शिक्षणमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेचे वेळी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक २० जानेवारी ते दिनांक २६ जानेवारी २०२५ या कालावधीत कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.
याबाबत करावयाच्या कार्यवाहीचा तपशील सोबत पाठविण्यात येत आहे. सदर सप्ताह आयोजित करणेसंदर्भात आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करणेबाबत सूचित करावे,
२) परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इनर अन्य शाळा/उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचान्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
कॉपीमुक्त अभियान सप्ताह अंतर्गत आयोजित करावयाचे उपक्रम
कॉपीमुक्त अभियान जनजागृती सप्ताह साजरा करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here
कॉपीमुक्त अभियान अंमलबजावणी परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३०२१४१८०२०८७१२१ असा आहे.





0 Comments