Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षा सूची PDF - दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून शिक्षा सूची जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी कोणताही गैरप्रकार केला तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाने शिक्षासूची तयार केली आहे. तसेच यंदा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांवर अनेक बंधने राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.


दहावी बारावी परीक्षा 2023 वेळापत्रक डाउनलोड करा. - Click Here

दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2023 प्रवेशपत्र/Hall Ticket डाउनलोड करा. - Click Here


राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भातील विद्याथ्र्यांसाठीच्या सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी शिक्षासूची परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजल्यानंतर परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्याथ्र्यांची संपादणूक रद्द करणे, पुढील परीक्षेसाठी प्रतिबंध करणे आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्याची करणे अशी कारवाई करण्यात येईल. यासह अन्य सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. शक्य झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षासूचीची प्रत उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन ती प्रत दप्तरी ठेवावी. 



शिक्षा सूची PDF - दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून शिक्षा सूची जाहीर

  1. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या प्रत्येक दिवशी आपले प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. ओळखपत्र आणि प्रवेशपत्राची मागणी केल्यावर ते दाखविले पाहिजे, असे नमूद करण्यात आले आहे.
  2. परीक्षार्थ्यांनी परीक्षेसाठी सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सकाळ सत्रात १०.३० नंतर व दुपार सत्रात २.३० नंतर परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही याबाबतही विद्यार्थ्यांना सूचित करावे.
  3. एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा काळात प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यास त्याला सलग पाच वर्षे परीक्षेपासून दूर ठेवले जाणार आहे. तसेच त्याच्यावर सायबर ॲक्टनुसार गुन्हाही दाखल होणार आहे.
  4. तोतया परीक्षार्थी परीक्षेस बसणे संपूर्ण परीक्षेची संपादणूक रह, पुढील पाच वर्षे परीक्षेला बसता येणार नाही. मूळ विद्यार्थी व तोतयाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. 
  5. बनावट प्रवेशपत्र तयार करणे व त्याआधारे परीक्षा देणे संपूर्ण परीक्षा रद्द व पोलिसात गुन्हा दाखल होणार
  6. उत्तरपत्रिकेत प्रक्षोभक, अर्वाच्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे व धमक्या व बैठक क्रमांक, दूरध्वनी क्रमांक लिहिणे, चौकशी करुन परीक्षार्थीची संबंधित विषयाची संपादणूक रद्द करणे.
  7. प्रश्नपत्रिकेची चोरी, विकणे अथवा विकत घेणे या परीक्षेसह पुढील पाच वर्षे बोर्डाच्या परीक्षांना बसता येणार नाही. तसेच सायबर लॉ ॲक्टनुसार गुन्हा दाखल होणार.
  8. मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने / साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगणे/ वापरणे. परीक्षार्थ्याची संबंधित विषयाची संपादणूक रद्द करणे
  9. खोटे हमीपत्र / अपघाताचा / अपंगत्वाचा वैद्यकीय दाखला केंद्रसंचालकाकडे सादर करून सवलत घेणे. 1) परीक्षेपूर्वी निदर्शनास आल्यास परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करणे, २) परीक्षेनंतर निदर्शनास आल्यास संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करणे.
  10. उत्तरपत्रिकेवर निळ्या काळ्या शाईव्यतिरिक्त अन्य शाईने लिहिणे संदर्भात भागास गुण मिळणार नाही.
  11. सविस्तर शिक्षा सूची PDF डाउनलोड करा. Click Here


इ.10वी नवनीत अपेक्षित प्रश्नपत्रिका संच व कृती आराखडा विषयनिहाय प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.

गेल्या  वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. त्यात शाळा कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र परीक्षेसाठी पंधरा मिनिटे ते अर्था तास अतिरिक्त वेळ आदींचा समावेश शक्य झाल्यास प्रत्येक होता. मात्र, यंदा नियमित पद्धतीने परीक्षा होणार असल्याने या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्याने कोणती चूक केल्यानंतर त्यासाठी कोणती शास्ती लावावी यासंदर्भातील यादीच मुख्याध्यापकांना पाठविण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments

close