महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune) यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या 10वी, / 12वीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट (SSC / HSC students hall ticket) मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. हे हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा सन 2026चे अंतिम वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
बारावी परीक्षा 2026 प्रवेशपत्र / Hall Ticket
यंदा 12वी ची लेखी परीक्षा ही 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. (दहावी व बारावी च्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कशा होतील? पहा.) या परीक्षेचे प्रवेशपत्र मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रवेशपत्र सोमवार (12 जानेवारी 2026) पासून कॉलेज लॉगीन (College Login) मध्ये डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास माध्यमिक शाळांंनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असेही बोर्डाने म्हटलं आहे.
Download HSC Board Exam 2026 Hall Ticket - Click Here
तणावाचे व्यवस्थापन - दहावी बारावी च्या परीक्षेतील तणावाचे व्यवस्थापन कसे कराल❓mscert पुणे व हार्टफुलनेस ट्रस्ट चे मार्गदर्शन video पहा.
प्रश्नपेढी संच - दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विषय निहाय व माध्यम निहाय प्रश्नपेढी संच डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शासन परिपत्रक - बारावी बोर्ड परीक्षा Hall Ticket डाउनलोड करणेबाबत परिपत्रक - Click Here
दहावी बोर्ड परीक्षा 2026 प्रवेशपत्र
यंदा 10वी ची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. (दहावी व बारावी च्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कशा होतील? पहा.) या परीक्षेचे प्रवेशपत्र मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रवेशपत्र ( जानेवारी 2025 रोजी) पासून स्कूल लॉगीन (School Login) मध्ये डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास माध्यमिक शाळांंनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असेही बोर्डाने म्हटलं आहे.
Download SSC Board Exam 2026 Hall Ticket - Click Here
शासन परिपत्रक - दहावी बोर्ड परीक्षा Hall Ticket डाउनलोड करणेबाबत परिपत्रक - Click Here
ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन देणेबाबत शाळांसाठी महत्त्वाच्या सूचना
- फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता 10वी, 12वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावीत.
- प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा / प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
- ज्या आवेदनपत्रांना "Paid" असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे "Paid Status Admit Card या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
- अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे "Extra Seat No Admit Card" या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
- Download केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव/आईचे नाव / जन्मतारीख अशा दुरूस्त्या असल्यास सदर दुरूस्त्या Online पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता Application Correction ही Link उपलब्ध करून देण्यात आलेली असून विहित दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर "Correction Admit Card या Link व्दारे सुधारीत Admit Card उपलब्ध होतील. विषय/माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात.
- ज्या आवेदनपत्रांना "Paid असे Status प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होवून "Late Paid Status Admit Card" या Option व्दारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील.
- प्रवेशपत्रात विषय व माध्यम यामध्ये काही चुका असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
- 🖥 इयत्ता १२वी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन विषयनिहाय शंका समाधान
- 🖥 इयत्ता १०वी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन विषयनिहाय शंका समाधान
- फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
- प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्व प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
- नवनीत अपेक्षित प्रश्नसंच व कृती पत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.






0 Comments