Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022. शाळा तिथे केंद्र.. कशा होतील दहावी बारावीच्या परीक्षा? काय म्हणाल्या शिक्षणमंत्री ?


दहावी व बारावी बोर्ड परीक्षा 2022 ऑफलाईनच होणार आहे. परीक्षा आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत विशेष उपाय योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. 

दहावी प्रश्नसंच व कृती आराखडा 2022 विषयनिहाय डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यासाठी शासन व मंडळामार्फत मुख्याध्यापक, विषय शिक्षक व तत्सम तज्ञांशी विचारविनिमय करून सदर परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.


🔖 इ.१०वी व इ. १२वी बोर्ड परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ बाबत विशेष उपाययोजना

⏰  परीक्षेचा कालावधी / वेळापत्रक

प्रचलित पद्धतीनुसार इ. १२ वीची परीक्षा २० फेब्रुवारी दरम्यान व इ. १० वीची परीक्षा ०१ मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.

इ.१२ वी लेखी परीक्षा दि. ०४ मार्च २०२२ ते दि. ३० मार्च २०२२ श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि. १४ फेब्रुवारी २०२२ ते दि. ०३ मार्च २०२२ 

इ.१० वी लेखी परीक्षा दि. १५ मार्च २०२२ ते दि. ०४ एप्रिल २०२२

श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि. २५ फेब्रुवारी २०२२ ते दि. १४ मार्च २०२२

दहावी व बारावी बोर्ड परीक्षा २०२२ संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करा. - Click Here

🔰  शाळा तिथे परीक्षा केंद्र

प्रचलित पद्धतीनुसार मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातात. तथापि दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2022 या ऑफलाईनच होणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा तिथे केंद्र / उपकेंद्र निर्माण करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शाळेतच घेण्यात येईल. १५ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या ठिकाणी एकापेक्षा अधिक माध्यमिक शाळा एकत्र करून परीक्षा घेण्यात येईल, अशा प्रकरणी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था त्यांना परीक्षेपूर्वी माहित करून दयावी. कोणताही विद्यार्थी या कारणास्तव परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 

बोर्ड परीक्षेसंबंधी मुख्याध्यापक व परीक्षार्थी विद्यार्थ्यांस महत्त्वाच्या सूचना - Click Here

⏰  परीक्षेसाठी वाढीव वेळ

विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ तसेच ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे.

Join WhatsApp group

https://chat.whatsapp.com/J4WiAXFrNrV6KnL6PKZrlQ

📚 अभ्यासक्रम

कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच अभ्यासक्रमात २५% कपात करण्यात आली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचे आयोजन ७५% अभ्यासक्रमावर करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येतील.

25 % कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम डाउनलोड करा. - Click Here

🔬 प्रात्यक्षिक परीक्षा

कोविड १९च्या प्रादुर्भावामुळे बहुसंख्य शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना निर्धारित प्रात्यक्षिककार्य पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत सवलतदेण्यात आलेली आहे.

इ. १२वी प्रात्यक्षिक कार्य हा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४०% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षाआयोजित करण्यात येणार आहे. इ.१०वी शाळांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४०% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन शक्य न झाल्यास प्रात्यक्षिकाऐवजी लेखन कार्यावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केले जाईल.

किमान ४०% च्या मर्यादितशाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेसाठी प्रयोग निवडण्याची लवचिकता असेल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहिःस्थ परिक्षक संबंधित शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधून नियुक्त करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत. परीक्षांचे नियोजन व सबमिशन गटनिहाय केले जाईल.

📿 तोंडी परीक्षा, अंतर्गत व तत्सम मूल्यमापन 

याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा दिली आहे. 

👩‍🦽 विशेष सवलत 

कोणताही विद्यार्थी आजारी पडल्यास किंवा अपरिहार्य कारणामुळे श्रेणी, तोंडी परीक्षा अंतर्गत व तत्सम मूल्यमापन प्रात्यक्षिक / सबमिशन करून शकल्यास लेखी परीक्षेनंतर इ.१० वी आणि इ. १२वीच्या विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा संधी देण्यात येईल. यासाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही.

🙂सुरक्षात्मक उपाययोजना - आजारी विद्यार्थ्यांसाठी

सर्व परीक्षा केंद्रांवर कोविड- १९मुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान लक्षणे दिसली तर विद्यार्थ्याला स्वतंत्र कक्षातपरीक्षा देण्याची मुभा असेल. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीयमदत पुरवली जाईल.

🗒️ विद्यार्थ्यांना १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका

कोविड १९ च्या संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर किमान एकते दिड तास अगोदर उपस्थित राहणेबाबत कळविण्यात येईल. विद्यार्थ्याला १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाईल. यामुळे ती सोडविण्याबाबत त्याला नियोजन करता येईल.

🙏 विद्यार्थ्याच्या आरोग्यास प्राधान्य 

सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी व संबंधित घटकांकरिता कोविड- १९ संदर्भात शासन व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे अनिवार्य असेल.

Post a Comment

0 Comments

close