Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दहावी - बारावीच्या परीक्षेसाठी 75%च अभ्यासक्रम. शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी कमी केलेला 25% पाठ्यक्रम डाउनलोड करा.

दहावी - बारावीच्या परीक्षेसाठी 75%च अभ्यासक्रम असणार आहे. यापूर्वी 25% कमी केलेला अभ्यासक्रम तेवढाच कमी असणार आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी इतर अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शिक्षणमंत्री यांनी केले आहे. 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून आणि दुसरीकडे प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम सुरु झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत येणे पसंत केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता राज्याची परिस्थिती पाहून 1 मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत होणार आहे. यंदा शाळा उशिरा सुरू झाल्याने बोर्ड परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, 40 टक्के अभ्यासक्रम कपातीची चर्चा होती. त्याला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला असून, 25 टक्केच अभ्यासक्रम कपात करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. कठीण काळातही शिक्षक, मुख्याध्यापक, सर्वजण उत्तम काम करत असून आजवर एकही मुलगा कोरोनाच्या विळख्यात सापडला नसल्याचे त्यांनी कौतुकही केले. 

शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी 25% कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम डाउनलोड करा. 

शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी सुद्धा मागील वर्षी प्रमाणे 25% पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. 

इ.9वी ते 10वी साठी - Click Here



इ.11वी ते इ.12वी साठी - Click Here



इ.१ली ते इ.८वी साठी कमी केलेला अभ्यासक्रम - Click Here


शाळांची स्थिती... 

कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि प्रतिबंधात्मक लस आली म्हणून नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले. 


पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांची उपस्थिती पाहून घेतला जाईल पहिली ते चौथीच्या शाळांचा निर्णय. 

मार्चपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन; सुरू झालेल्या शाळांचा दररोज घेतला जातोय आढावा 

दररोज तीन तास, तीन विषयांनाच दिले जात आहे प्राधान्य; मुलांच्या आरोग्याला पहिले प्राधान्य, अंगणवाडी, बालवाडी यंदा सुरू होणार नाहीत . 

पाचवी ते बारावीपर्यंतच्या एक लाख 28 हजार 695 पैकी 68 टक्के शाळा सुरू झाल्या असून एक कोटी 34 लाख 95 हजार 28 पैकी 34 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत येत आहेत. 


Post a Comment

1 Comments

close