वंदे मातरम् :- दि. 31 ऑक्टोबर, 2025 (कार्तिक शुध्द नवमी) ते दि.07 नोव्हेंबर, 2025 या कालावधी दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये संपुर्ण वंदे मातरम् चे गायन करण्यात येणार आहे. तसेच वंदे मातरम् प्रदर्शनी भरविण्यात येणार आहे. वंदे मातरम् संपूर्ण गीत PDF, MP3, Video फॉरमॅट मध्ये डाउनलोड करा.
स्व. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित 'वंदे मातरम्' या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी तिथीनुसार म्हणजेच कार्तिक शुद्ध नवमीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील शाळांमधून रोज वंदे मातरम् या गीताची पहिली दोनच कडवी गायिली जातात, परंतु १५० वर्षपूर्तीचे औचित्य साधून दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी सर्व शाळांमधून संपूर्ण वंदे मातरम् चे गायन व्हावे व वंदे मातरम् गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळांच्या दर्शनी भागात लावण्यात यावी अशी विनंती संदर्भाधीन पत्रान्वये करण्यात आलेली आहे. तसेच, दैनंदिन वापरातील ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, दि. ०७ नोव्हेंबर, २०२५ रोजी 'वंदे मातरम्' या गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
त्याअनुषंगाने दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ ते दि.७ नोव्हेंबर, २०२५ या कालावधी दरम्यान, राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संपुर्ण वंदे मातरम् चे गायन होण्याबाबत व वंदे मातरम् गीताचा इतिहास सांगणारी प्रदर्शनी शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत राज्यातील सर्व शाळांना सूचित करण्यात आले आहे.
वंदे मातरम् संपूर्ण गीत
Vande Mataram Full Song
वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम् शस्य श्यामलां मातरं ।
शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम् फुल्ल कुसुमित द्रुमदलशोभिनीम्,
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् । सुखदां वरदां मातरम् वंदे मातरम्
सप्त कोटि कण्ठ कलकल निनाद कराले निसप्त कोटि भुजैर्धृउत खरकरवाले के बोले मा तुमी अबले बहुबल धारिणीं नमामि तारिणीम् रिपुदलवारिणीं मातरम् ॥ वन्दे मातरम्
तुमि विद्या तुमि धर्म, तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुमि मा शक्ति, हृदये तुमि मा भक्ति, तोमारै प्रतिमा गडि मन्दिरे मन्दिरे ॥ वन्दे मातरम्
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम् नमामि कमलां अमलां अतुलाम् सुजलां सुफलां मातरम् ॥ वन्दे मातरम्
श्यामलां सरलां सुस्मितां भूषिताम् धरणीं भरणीं मातरम् ॥ वन्दे मातरम्
.





0 Comments