Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी उतारे व त्यावरील प्रश्न | उतारा क्रमांक 4 - नवोदय उतारे | नवोदय मराठी उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा मराठी उतारे

उतारा क्रमांक 4 - मराठी उतारा व त्यावरील प्रश्न | नवोदय उतारे | नवोदय मराठी उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा उतारे | शिष्यवृत्ती परीक्षा मराठी उतारे


तरतरीत आणि आरोग्य संपन्न राहण्याकरता तुम्हाला शारीरिक दृष्टीने सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे. नियमित शारीरिक सक्रियता तुम्हाला लठ्ठपणा, हृदय विकार, कर्करोग, मानसिक आजार, मधुमेह आणि सांधेदुखी यासारख्या गंभीर रोगांपासून संरक्षण देते. नियमितपणे सायकल चालवणे हे मरगळलेल्या जीवनशैलीच्या समस्याशी संबंधित अशा अनेक बाबींशी तुमचा धोका कमी करण्यास तुम्हाला मदत करू शकते. सायकल चालवणे हा आरोग्यपूर्ण कमी आघात करणारा व्यायाम प्रकार आहे. आणि त्याचा आनंद लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व वयाच्या लोकांना घेता येतो. तो मजेदार स्वस्त आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही चांगला आहे. कामाच्या ठिकाणी अथवा दुकानात सायकल चालवत जाणे हा देखील नियमित व्यायाम आणि रोजचा दिनक्रम यांना जोडण्याचा एक सर्वात वेळ वाचवणारा मार्ग आहे. साधारणपणे एक दशलक्ष लोक प्रवास, मनोरंजन आणि खेळ यासाठी सायकल चालवतात असा अंदाज आहे. सायकल चालवणे हा वजन घटवण्याचा उत्तम मार्ग आहे कारण त्यामुळे स्नायू संघटित होतात आणि चरबी जळून जाते. संशोधन असे सुचवते की रोज अर्धा तास सायकल चालवल्याने आपण वर्षभरात किमान पाच किलो वजन घटवू शकतो. 

वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 




1- या उताऱ्याचा मुख्य उद्देश आहे आपल्याला फायदे सांगणे-

1 - आरोग्यपूर्ण राहण्याचे 

2 - सायकल चालवण्याचे. 

3 - व्यायामाचे. 

4 - वजन कमी करण्याचे. 


2- जेव्हा लेखक म्हणतो, "सायकल चालवणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने ही चांगली आहे." तेव्हा खालीलपैकी कोणते सत्य नाही - 

1 - सायकल कुठलेही अनारोग्यकारक वायू सोडत नाही 

2 - ती पेट्रोल किंवा डिझेल या विना चालते 

3 - ती हवेला प्रदूषित करीत नाही 

4 - ती सर्व वयाच्या माणसांना चालवता येते


3- 'मरगळलेल्या' याचा विरुद्ध शब्द - 

1 - सक्रिय 

2 - आळशी 

3 - क्रिया शून्य 

4 - कामाला जुंपलेला


4- कमी आघात करणारा व्यायाम म्हणजे असा व्यायाम की जो - 

1 - दमवणार नसेल 

2 - महाग नसेल 

3 - कार्यक्षम नसेल

4 - कंटाळवाणा नसेल


5- नियमित सायकल चालवणे आपल्या खालील सोडून सर्वांमध्ये मदत करतो - 

1 - चरबी कमी करणे आणि स्नायू बळकट करणे

2 - काम आणि गंमत यांची सांगड घालतो 

3 - गंभीर अपघात टाळणे

4 - आरोग्यपूर्ण राहणे


6- रोज अर्धा तास सायकल चालवल्याने काय होईल? 

1 - नवीन संशोधन उदयास येईल 

2 - सांधेदुखीशी संबंधित आजार होतील 

3 - सायकल चालवणे कंटाळवाणे वाटेल 

4 - वर्षभरात पाच किलो वजन घटेल


7- वजन घटवण्याचा सर्वोच्च मार्ग आहे. 

1 - वजन घटवण्याच्या गोळ्या घेणे 

2 - औषधोपचार करणे 

3 - सायकल चालविणे 

4 - गोड पदार्थ खाणे



नवोदय उतारे
नवोदय मराठी उतारे
नवोदय उतारे pdf मराठी 
नवोदय उतारे PDF मराठी डाउनलोड
navoday utare
navoday utare pdf marathi
navoday utare pdf marathi download
navoday utare pdf download


शिष्यवृत्ती परीक्षा उतारा वाचन
उतारा व त्यावर आधारित प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा
शिष्यवृत्ती परीक्षा उतारा व त्यावर आधारित प्रश्न
उतारा व त्यावरील प्रश्न pdf
मराठी उतारा वाचन pdf
मराठी उतारे व प्रश्न

Post a Comment

0 Comments

close