Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लोकसभा निवडणूक 2024 - मतदान केंद्रात पाळणाघर, मतदारांना मिळणार एनर्जी ड्रिंक, तसेच घेतली जाणार आरोग्याची काळजी

लोकसभा निवडणूक 2024 - मतदान केंद्रात पाळणाघर, मतदारांना मिळणार ज्यूस, तसेच आरोग्याची काळजी घेण्यात येणार Lok Sabha Elections 2024 - Voting Centers to have palanaghar, energy drinks for voters, health care



मतदान केंद्रात पाळणाघराची सोय

लोकसभा निवडणुक 2024ची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांत तात्पुरत्या पाळणा घरांची सुविधा देण्यात येणार आहे. मतदान करायला आलेल्या महिलांना त्यांच्याकडील पाच वर्षांखालील मुलांना काही वेळ पाळणा घरात ठेवता येणार आहे. पाळणा घरात खेळणी व मनोरंजन साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रांवर येणाऱ्या महिलांची अडचण होऊ नये. घरी लहान मुलं असल्यावर मतदान करायला महिला बाहेर पडत नाहीत, अशा महिलांसाठी मतदान केंद्रांवर तात्पुरत्या पाळणा घराची सुविधा देण्यात येणार आहे. यात महिला कर्मचारी पाळणा घरात येणाऱ्या मुलांची काळजी घेणार आहेत. त्या महिला लहान मुलांचा सांभाळ करतील.


मतदारांना मिळणार एनर्जी ड्रिक

तसेच मार्चनंतर कडक ऊन राहणार असल्याने मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना एनर्जी ड्रिक मिळणार असून, यामुळे अधिक काळ मतदानाच्या रांगेत थांबणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. उन्हाळा सुरू झाल्याने मतदारांना ज्यूस देण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळे यांनी दिली आहे. 


मतदाराच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार

मतदान केंद्राजवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे संपर्क नंबर मतदान केंद्रात लावले जाणार आहे. आपत्कालीन काही प्रसंग उ‌द्भवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी संबंधितांना दाखल करण्यात येणार असून, तशी यंत्रणा मतदान केंद्रात असणार आहे.

Post a Comment

0 Comments

close