Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*Whatsapp वापरणं मानसिक आरोग्यासाठी चांगलं की वाईट?*

तास-न्-तास स्मार्ट फोनवर वेळ घालवणाऱ्यांना बऱ्याच जणांकडून वारंवार दम भरला जातो. पण सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. व्हॉट्सअॅपसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक वेळ घालवणं आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने हिताचं असतं, असं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियाचा जास्त वापर करणाऱ्या लोकांचं मानसिक आरोग्य उत्तम असतं, अशी माहिती समोर आली आहे.

ज्या मेसेजिंग अॅपमध्ये युजर्संना ग्रुप चॅट करण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो, अशी माहिती एका आंतरराष्ट्रीय मासिकात छापण्यात आलेल्या रीसर्चमध्ये नमुद करण्यात आली आहे.

'जेवढी लोक व्हॉट्स अ‍ॅपवर अधिक वेळ घालवतात, त्यांना एकटेपणाची भावना सतावत नाही. शिवाय, त्यांच्यातील आत्मविश्वासदेखील वाढल्याचं पाहायला मिळालं. यामुळे कुटुंबीय आणि मित्र परिवार आपल्या अधिक जवळ आहोत, असे त्यांना वाटतं', अशी माहिती रीसर्चमध्ये आढळून आली आहे.

एका प्राध्यपकानं दिलेल्या माहितीनुसार,' सोशल मीडियावर वेळ घालवणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आणि वाईट? यावर नेहमीच चर्चा होत असतात. पण ज्यानुसार लोकांमध्ये समज आहेत, तितका हा पर्याय आरोग्यासाठी धोकादायक नाही.

जी लोक व्हॉट्स अ‍ॅपवर अधिक वेळ घालवतात, त्यांना मित्र परिवार आणि नातेवाईक आपल्या जवळ नसल्याची उणीव भासत नाही.

संशोधनकर्त्यांनी 200 जणांवर अभ्यास केल होता. यामध्ये 158 महिला आणि 42 पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्व जण वय वर्षे 24 वयोगटातील होते. हे सर्व जण दिवसातून सरासरी 55 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments

close