Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बालकविता - *गुरुजी मी पुन्हा येईल*


*गुरुजी मी पुन्हा येईल*
दिवाळी झाल्यावर शाळेत
मग पुन्हा तीच मस्ती अन् तोच दंगा
तुम्ही आवरा हो मला कितीही
तरी पुन्हा घेईलच मी तुमच्याशी पंगा

*गुरुजी मी पुन्हा येईल*
नेहमीसारखंच तुमचं डोकं खायला
अन् तुमच्याकडून जगणंही शिकायला
जीवनात यशस्वी होण्याचा पाया
तुमच्याकडूनच भक्कम रचून घ्यायला

*गुरुजी मी पुन्हा येईल*
शाळेत मिळणारं मध्यान्ह भोजन खायला
हसत खेळत जगण्याचं ज्ञान मिळवायला
तुमच्याकडून मिळणारी ज्ञानाची शिदोरी
आयुष्यभर माझ्या पाठीशी घट्ट बांधायला

*गुरुजी मी पुन्हा येईल*
मोठा झाल्यावर पुन्हा तुम्हाला भेटायला
शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायला
अन् जीवनात उत्तुंग यश मिळाल्यावर ही
तुमच्या जवळ पुन्हा कृतज्ञता व्यक्त करायला

*गुरुजी मी पुन्हा येईल!*
               *मी पुन्हा येईल!*
                     *मी पुन्हा येईल!*
____________________

Post a Comment

0 Comments

close