मुख्याध्यापक यांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील वाहन भत्ता अदा करणेबाबत....
संदर्भ
१. वित्त विभाग शासन निर्णय क्र. वाहभ २००९/प्रक्र७८ / सेवा ५/दि.५ एप्रिल २०१०
२. वित्त विभाग शासन निर्णय क्र. वाहभ २०२०/प्रक्र०३ / सेवा ५/ दि.२० एप्रिल २०२२
३. अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांचे पत्र दि. १५ एप्रिल २०२४
वरील विषयी संदर्भीय पत्र क्र.१ अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता लागू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन नियम २०१९) अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.१-१-२०१६ पासून सुधारित वेतन स्तर लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजुर केलेला वाहतुक भत्त्याच्या दरात संदर्भ क्र. २ अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे.
संदर्भ क्र. ३ अन्वये महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ जि. शाखा, परभणी यांनी उन्हाळी सुट्टीचे कालावधी वाहतुक भत्ता कपात केल्या बाबत या कार्यालयास कळवून कपात करण्यात आलेला वाहतुक भत्ता शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांना मिळणे बाबत विनंती केलेली आहे.
करीता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काम करणाऱ्या अपग्रेड मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीचे कालवधीत माहे मे २०१० पासून कपात केला जात असलेला वाहतुक भत्ता संदर्भीय शासन निर्णय क्र. १ व २ च्या तरदुतीच्या आधिन राहून लागू करण्यात येत आहे.
तरी ज्या मुख्याध्याकांचा उन्हाळी सुट्टी मध्ये वाहतुक भत्ता कपात करण्यात आलेले आहे त्यांना तात्काळ वाहतुक भत्त्याची रक्कम फरकासह आदा करण्यात यावी तसेच माहे मे २०२४ च्या वेतन देयकात मुख्याध्यापकांना वाहतुक भत्ता समाविष्ट करावा.
परिपत्रक पहा.
0 Comments