Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

21 जून - आंतरराष्ट्रीय योग दिन | 21 जून 2024 हा दिवस दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करणे बाबत.

21 जून - आंतरराष्ट्रीय योग दिन | 21 जून 2024 हा दिवस दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 

योग दिन मार्गदर्शक PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.


शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक २१ जून रोजी साजरा करण्यात येतो. सयुंक्त राष्ट्रसंघाने "२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी २१ जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सविस्तर माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यानुसार योग विषयक दिलेल्या सुचनाचे पालन करुन जिल्ह्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा च्या संयुक्त विद्यामाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात यावा.


आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी खालील सुचनांचे पालन करण्यात यावे.

१. जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने योग दिनाचे आयोजन करण्यात यावे.

२. शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन सी सी नेहरु युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यामध्ये सदर योग दिन साजरा करण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.

३. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाळामध्ये सदर दिनाचे आयोजन करण्यात यावे.

४. योग विषयक प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या विविध संस्था यांचे सहकार्य घेण्यात यावे. त्यांची बैठक आयोजित करुन त्यांचे मार्गदर्शक यांचे सहकार्य घेण्यात यावे.

५. मुख्य कार्यक्रमामध्ये मा. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नामांकित खेळाडू, नागरीक यांना आंमत्रित करण्यात यावे.

६. योग विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर दिनाचे महत्व विचारात घेऊन चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात यावे.


21 जून 2024 हा दिवस दहावा आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करणेबाबत परिपत्रक  डाउनलोड करा - Download


Prime minister award for yoga 2024 - www.ayush.gov.in

प्रधानमंत्री योगा 2024 पारितोषिक www.ayush.gov.in

Post a Comment

0 Comments

close