कोरडा खोकल्यात कफ नसतो, फक्त घसा कोरडा पडतो व खोकला येतो. प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो.
घरगुती उपचाराने कोरडा खोकला 10-15 दिवसांत बरा झाला नाही तर तज्ज्ञांकडे जावे.
काही घरगुती उपाय...
1.नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो. यामुळे फुफुसाचे कार्य सुधारते आणि कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
2.काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्यापासुन आराम मिळतो.
3.पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो.
4.तुळस आणि बडिशेपेचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे.
5.भेंडीचे 50 मिली काढा दिवसातून तीन वेळा घेतल्याने गळ्याची खराश आणि कोरडा खोकलापासून आराम मिळतो.
6.कोरडा खोकला हा तूप, बाळहिरडा, खडीसाखर, इत्यादी घरगुती उपायांनी आटोक्यात येऊ शकतो.
7.बिब्ब्याला खिळा टोचून खिळयाला लागणारे तेल कोमट दुधात मिसळा. असे अर्धा कप दूध दहा दिवस रोज द्यावे.
9.सर्वसाधारण खोकल्यासाठी सितोपलादी चूर्ण एक-दीड चमचा द्यावे. कोरडा खोकला असताना हे चूर्ण एक चमचा तुपात द्यावे.
10.हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी.
11.कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे.
12.कोरड्या खोकल्यावर बदाम हे रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची बारीक पेस्ट करून ती सकाळ-संध्याकाळ लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी.


0 Comments