शिक्षक भरती पवित्र पोर्टल झाले सुरु | पवित्र पोर्टल वर नाव नोंदणी कशी करावी? Flow Chart पहा. pavitra portal registration link -https://mahateacherrecruitment.org.in/
पवित्र पोर्टल संकेतस्थळ
https://mahateacherrecruitment.org.in/
Pavitra Portal Website
https://mahateacherrecruitment.org.in/
New Update
पवित्र पोर्टल शिक्षक भरती नवीन अपडेट पहा. - Click Here
New Update - 28 ऑगस्ट 2026
📢 पवित्र पोर्टल - कागदपत्र पडताळणी व नियुक्ती देणेबाबत महत्त्वाच्या सूचना
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ - निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी
✅ *महत्त्वाच्या तारखा:*
• कागदपत्र पडताळणी कार्यवाही: *दि. ०२/०९/२०२६ ते ०५/०९/२०२६*
• पात्र उमेदवारांचे समुपदेशन: *दि. ०७/०९/२०२६ ते ११/०९/२०२६*
• उमेदवार संख्या कमी असल्यास नियुक्ती: दि. ०५/०९/२०२६ पूर्वी
📌 *पात्रतेसाठी विचारात घ्यायच्या तारखा (मुद्दा १६.२):*
• शैक्षणिक अर्हता धारण करण्याची अंतिम तारीख: *१४/०५/२०२५*
• व्यावसायिक अर्हता धारण करण्याची अंतिम तारीख: *२५/०९/२०२५*
• वय विचारात घेण्याची तारीख: अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक *१४/०५/२०२५*
📄 *आवश्यक कागदपत्रे (मुद्दा १७):*
१. पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्राची प्रत
२. शालान्त परीक्षा गुणपत्रक/प्रमाणपत्र (जन्मतारखेसाठी)
३. उच्च माध्यमिक गुणपत्रक व प्रमाणपत्र
४. डी.एड./डी.एल.एड./डी.टी.एड./टी.सी.एच. गुणपत्रक व प्रमाणपत्र
५. टीईटी/सीटीईटी गुणपत्रक व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
६. पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र
७. बी.एड./बी.ए.एल.एड./बी.एस्सीएड. इ. व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र
८. रहिवासी/जात/जात वैधता/दिव्यांगत्व/माजी सैनिक इ. लागू असणारी प्रमाणपत्रे (मुद्दा १७.१०-१७.२३)
⚠️ *लक्षात ठेवा:*
• स्व-प्रमाणपत्रातील माहिती व मूळ कागदपत्रे यात तफावत आढळल्यास उमेदवार नियुक्तीस अपात्र ठरेल (मुद्दा ११)
• चारित्र्य पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करणे आवश्यक (मुद्दा १९)
• अपात्र उमेदवारास नियुक्ती दिल्यास जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील (मुद्दा २२)
सर्व पात्र उमेदवारांनी वरील कागदपत्रे वेळेत तयार ठेवावीत. 🙏
पवित्र पोर्टल मधून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व समुपदेशनाद्वारे नियुक्ती देणेबाबत मार्गदर्शक सूचना परिपत्रक - Click Here
New Update - 27 ऑगस्ट 2026
Selection Listपवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरती साठी निवड याद्या जाहीर करण्यात आली आहेत.
Selection list निवड यादी डाउनलोड करा.
Selection List
पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरती साठी निवड याद्या जाहीर करण्यात आली आहेत.
Selection list निवड यादी डाउनलोड करा.
https://mahateacherrecruitment.org.in/
सदर निवड यादी TAIT 2025 घ्या परीक्षेतील गुणांवर आधारित आहे.
व्यवस्थापन निहाय व जिल्हानिहाय निवड यादी व कट ऑफ
Converted Round
पवित्र पोर्टलवर रिक्त राहणाऱ्या पदांसाठी Converted Round घेण्यात येणार
👇 रिक्त जागांचा तपशील📌 माजी सैनिक 2,760📌 अंशकालीन 1,760📌 ST 802📌 ST पेसा 1,408📌 निवड यादीतील हजर न झालेले त्यांची पदे
शिक्षक म्हणून निवड झालेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉👍
Converted Round
पवित्र पोर्टलवर रिक्त राहणाऱ्या पदांसाठी Converted Round घेण्यात येणार
👇 रिक्त जागांचा तपशील
📌 माजी सैनिक 2,760
📌 अंशकालीन 1,760
📌 ST 802
📌 ST पेसा 1,408
📌 निवड यादीतील हजर न झालेले त्यांची पदे
New Update - 06/08/2026
पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम Generate आणि Lock करण्याची सुविधा दि.06/08/2026 ते 11/08/2026 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परिपत्रक
मुदतवाढ - प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करणेस 16 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
New Update - 10 July 2026
शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्यास मुदतवाढ देणेबाबत - Click Here
New Update - 09-01-2026
✅ उमेदवारांसाठी दिनांक २६/१२/२०२५ रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यातील खुल्या प्रवर्गातून CTET दिलेल्या ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट / सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट / सवलतीचा लाभ घेता येणार नाही. यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की, शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी वा परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणांची सूट/सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
✅ राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास उमेदवारांकडे राज्यात अधिवास असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे, तथापि काही उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत परंतु अधिवास प्रमाणपत्रे (Domicile Certificate) उपलब्ध नाहीत. अशा उमेदवारांनी खालील अ), ब) व क) मध्ये दर्शलल्याप्रमाणे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा व अतिरिक्त कागदपत्रे यामधील प्रत्येकी एक पुरावा एकत्रित पीडीएफ करून अपलोड करावा.
अ) ओळखीचा पुरावा (खालीलपैकी कोणताही एक) :-
१) आधार कार्ड
२) वाहन चालविण्याचा परवाना
३) पासपोर्ट
४) पॅन कार्ड
५) मतदार कार्ड
ब) पत्त्याचा पुरावा (खालीलपैकी कोणताही एक) :-
१) टेलिफोन, गॅस, वीज देयक, मालमत्ता कर इत्यादी उपयुक्तता बिले.
२) बँक पासबुक
३) रेशन कार्ड
४) भाडे करार
क) अतिरिक्त कागदपत्रे :-
१) महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचे जन्म प्रमाणपत्र
२) महाराष्ट्र राज्यात शिक्षण झाल्याबाबतचा शाळा सोडल्याचा दाखला
३) महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
✅ ज्या उमेदवारांनी यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) नाही म्हणून त्याप्रमाणे स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले असेल. मात्र, त्यांच्याकडे वरील अ, ब आणि क मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील प्रत्येकी एक पुरावा उपलब्ध असेल, अशा उमेदवारांना त्यांचे स्व-प्रमाणपत्र Uncertify करून योग्य तो पुरावा अपलोड करून स्व-प्रमाणपत्र पुन्हा पूर्ण करता येईल, याची नोंद घ्यावी. मात्र, कागदपत्रे पडताळणीच्या वेळी मूळ अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे बंधनकारक राहील.
✅ पोर्टलवर नोंदणी (Registration) करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र स्वप्रमाणित (Self Certification) करण्यासाठी दिनांक १४.०१.२०२६ पर्यंत मुदतवाढ राहील, यावी संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सूचना पत्रक 09 जानेवारी 2026 - Click Here
TAIT 2025 चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.
उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी सूचना PDF डाउनलोड करा. Click Here
Pavitra - Teacher Recruitment 2025 website
पवित्र पोर्टल संकेतस्थळ
https://mahateacherrecruitment.org.in/
Pavitra Portal Website
https://mahateacherrecruitment.org.in/
पवित्र पोर्टलवर नावनोंदणी कशी करावी? स्व प्रमाणपत्र कसे करावे? Flow chart पहा.









0 Comments