*मोबाईल तर अस्तित्वात नव्हतेच पण साधे फोनही सर्वांकडे नव्हते.*
*जानेवारी सुरु झाला कि रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकान दिसायची न स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची.*
*मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायची.*
*काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.*
*हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असतो आणि सुगंध असतो, नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावनांचा.*
*पाकिटातून आलेले चारदोन दाणे जेव्हा हातावर पडायचे तेव्हा एखाद्या नव्याने लग्न करून सासरी नांदणाऱ्या मुलीचा भाऊ नाहीतर वडील पत्रात शेवटी "काळजी घे " म्हणायचे तेव्हा तिच्या नकळत हुंदका यायचा, डोळ्यात आठवणी दाटून पाणी तरळून जायचं.*
*त्या पत्रातल्या अक्षरावरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवत असायचा.*
*कितीही चांगले टाईप वापरून, रंग, फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगानं येताहेत सोशल मिडीयावर.*
*पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या "काळजी घ्या" ची सर कशाला नाही.*
*आता अस पत्र हाताने कधी कुणाला लिहून पाठवल होत शेवटी हेही आठवत नाही.*
*हाताने लिहिणं थांबलंय तर पत्र लांबची गोष्ट.*
*हा फोटो न शुभेच्छा मेसेजचा पूर कितीही आला तरी काहीसा कोरडा वाटतोय.*
*बदल होत राहतात, बदल होण एवढच फक्त चिरंतन आहे हेही कबूल.*
*पण असे दिवस काहीतरी जुन्या* *आठवणी चाळवून जातात अन्* *आतून सगळ ढवळून जातात.*
*तिळगुळ घ्या गोड बोला !!!*
*संवाद असू द्या स्नेह असू द्या !!*


0 Comments