*उपाय -----*
१) जास्तीत जास्त शाकाहारी बणा.
२) एकाचवेळी भरपेट खाऊ नका. जेवल्यावर सहज चालता पळता आले पाहीजे. आळस येता कामा नये.
३) लांब वाढणा-या भाज्या खा. (शेंगा, पडवळ, शिराळी, दुधी इ.) लांबलचक राहाल.
४) आकाराने गोल असलेल्या भाज्या कमी खा. (भोपळा, बटाटा, वांगी) गोल आकाराच्या भाज्या वारंवार खाल्ल्याने आकार लवकर गोल होईल.
५) पोटाला ताण देणारी सर्व योगासने करा. उदा. धनुरासन, भुजंगासन, चक्रासन, नौकासन इ.
६) प्राणायाम रोज अर्धा तास करा. (भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम)
७) भरभर चाला. जाँगिंग करा. श्वासावर शारीरिक हालचाली करा. सूर्यनमस्कार नियमित १२ ते १५ घाला. लवकर लाभ होईल.
८) रात्रीचे जेवण गरज असेल तरच घ्या. लवकर चरबी कमी होते. किंवा संध्याकाळी ७ च्या आत जेवा.
९) सकाळी लिंबू रस १ चमचा + कोमट पाणी १ ग्लास + १ चमचा मध घ्या.
१०) कोमट पाणी पिण्याची सवय करा.
११) जेवणापूर्वी एक तास अगोदर एक ग्लास पाणी प्या. निम्मे जेवण केल्यावर १/२ घोट पाणी प्या. जेवल्यावर १/२ घोटच पाणी प्या. १ तासानंतर पोटभर प्या.
१२) सकाळी एक ग्लास फक्त गरम पाणी चहाप्रमाणे बशीतून प्या.
१३) जेवल्यावर लगेच जास्त पाणी प्यायल्यास १०० % लठ्ठपणा वाढतो.
१४) आठवड्यातून एक दिवस फक्त पाणी पिऊन एक पूर्ण दिवस उपवास करा.


0 Comments