Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*शिक्षकांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीचा जाहीर निषेध... काही विचारप्रवर्तक कमेंट्स*

शिक्षकांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अशा संपादिकय लेखाचा व अस अभद्र लेखन करणाऱ्या व्यक्तीचा सर्वानी जाहिर निषेध करावा अशी मी सर्वांना विनंती करतो.
https://www.shaleyshikshan.in
       अशा अपप्रवृत्तींना वेळीच आळा घातला पाहिजे.

काही निषेधार्थ कमेंट

@१
माणूस म्हणून नालायक असू शकता पण संपादक म्हणून यावर विश्वास बसत नाही. सर्व शिक्षक बंधुभगिनींनी कोणतीच सुरक्षा नसताना, प्रशिक्षण नसताना जीवाची पर्वा न करता कर्तव्य म्हणून covid मध्ये काम केले.असंख्य कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब यांना सुरक्षा साहित्याशिवाय धोक्यात टाकले याला जबाबदार कोण ?  राशन वाटप, चेक पोस्ट, 60+सर्वे , कुटुंब सर्वे व  यांचा नियमित  पाठपुरावा. ही कामे कोणी केली ? त्याचप्रमाणे विध्यर्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन, ऑफलाईन, गृहभेटी दिल्या, अभ्यास घेतला पण आपणास हे दिसले नाही दिसणारही नाही.ग्रामीण भागात अतिश्रीमंत वर्ग सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण आहे असा आपला अभ्यास आहे वाटते.एक शिक्षक म्हणून जेव्हा सर्व व्यवहार सुरु झाले तेव्हाच शासनाने शाळा सुरु कराव्या ही इच्छा होती. गृहभेटी द्या, गटात शिकवा, शाळेच्या मैदानात शिकवा. मग वर्गात गटात बोलवून शिकवण्यास बंदी का ? का वर्गातच फक्त कोरोना होतो ? कोरोना जागतिक महामारी आहे की नाही ? शिक्षकांना कोरोना घाबरतो का ? या सर्व प्रश्नाचा वस्तुस्थितीचा आढावा घेऊन लिखाण केल असतं तर वाचक वाढले असते अन आपल्या दरिद्री बुद्धिमतेचा परिचय आपल्या लिखाणातून आला नसता.शब्दांच ग्राफ्टिंग सोपं असतं जमलच तर वस्तुस्थितीचे ग्राफ्टिंग करा 🙏🙏

🌑🌑जाहीर निषेध 🌑🌑

@२
ज्या शिक्षकांमुळे तुम्ही लिहायला शिकलात त्या शिक्षकां बाबतीत लिहिताना काहीच वाटत नाही का??????😡😡

@३
स्थानिक शाळांनी, शिक्षकांनी या भिकारचोट खंडणीखोराला जाहीरात व शुभेच्छा छापण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने खंडणीखोर चिडला। या अपसंपादकाच्या शरीरात किडे पडतील

@४
दैनिक *लोकपत्र* हा नांदेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते *कमलकिशोर कदम* यांच्या मालकीचा पेपर आहे. वरील गलिच्छ, असंसदीय भाषेतील अग्रलेख *लोकपत्र* च्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये प्रकाशित झाला आहे.

हा लेख लिहिणारा औरंगाबाद येथील लोकपत्रचा संपादक *रविंद्र तहकीक* आहे. हा एक अत्यंत विकृत विचारसरणीचा व्यक्ती आहे. त्याची भाषाशैली वाचून कुणाच्याही लक्षात येईल की, *संपादक किंवा पत्रकार होण्याची त्याची पात्रता नाही.*

तो आज ज्या पदावर विराजमान होऊन पगार घेत आहे, ते केवळ शिक्षणामुळेच..! पण याची त्याला आठवण नाही. त्याला घडविण्यात कोणत्या ना कोणत्या *मास्तरांचाच* वाटा आहे. पण हा *तहकीक* कृतघ्न आहे*

विकृत बुद्धीच्या रविंद्र तहकीक चा जाहीर निषेध...

⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

@५
*निषेध!,निषेध!! निषेध!!!*
अरे मुर्खा,तू इतका नीच,नालायक आणि कृतघ्न असशील याची कल्पना करू मी शकत नाही. तुझ्या बापाने लंगोटी घालून जीवन ढकलले असेल कदाचित,भिक मागून तुला मोठ केलं असेल कदाचित, म्हणून तू तर लंगोटी लावत नाहीस ना? त्यांनी भीक मागितली असेल म्हणून तू तर मागत नसशील ना? मुर्खा फुटपाथवर रहात असल्यासारखा बोललास,उकिरड्यावर अन्न शोधून खाल्ल्यासाराखा बोललास, सरस्वती मातेच्या हातून स्वर्गातून शिकून आल्यासारखा बोललास,गुरुजींचं तोंड तू बघितलं नसणार .त्यामुळे तू गुरुजींची लायकी काढून तुझी औकात दाखवलीस.तुझ्यात सभ्यपणा नाही म्हणून तू संपादकीय लेखनाच्या सुरुवातीलाच *गुरुजींना मास्तरड्या* म्हटलेस.
      खर तर तुझ्या लेखनाला उत्तर द्यायचं म्हणजे दारातल्या कुत्र्याला किंमत दिल्यासारखे होईल.पण माफ करा.तो तर इमानदार आहे.तुझ्यासारखा बेईमान नाही.तू बेईमान नसतास तर स्वतः च्या *गुरुजींना मास्तरड्या* म्हटले नसतेस.
    अरे तू तर आमच्या दृष्टीने असुर आहेस.कारण असुराकडे असणारे सर्व गुण तुझ्याकडे आहेत. कसला तू संपादक? तुझी तर साधा चपराशी बनण्याची लायकी नाही.कारण तो तरी समोरच्याचा सन्मान करतो.
      अरे दिवट्या, कोरोना काळात शिक्षकांनी आरोग्य यंत्रणेला,पोलीस यंत्रणेला,जिल्हा,तालुका प्रशासनाला,केलेले सहकार्य दिसले नाही का ?ऑनलाईन शिक्षण , वाडीवस्त्यावरून जाऊन केलेले काम तुला दिसले नाही का? स्वनिधी काढून राबविलेले निरनिराळे उपक्रम नाही दिसले काय?
        उत्कृष्ट पत्रकार दोन्ही बाजू लिहितो.तुला शिक्षकांनी केलेली चांगली काम दिसली नाहीत काय? की तू *मानसिक विकृत* आहेस.
        तुझ्या वाचाळविरासारख्या लेखनीतून तू तुझी लायकी दाखवलीस.ज्यांना तू मास्तरड्या म्हटले ते तुझे गुरुजी जीवंत  असतील तर त्यांना मरणयातना होतील.आणि आईबाबा जीवंत असतील तर ते आपल्या कर्माला दोष देतील की तुझ्यासारख्या कपाळ     करण्ट्याला जन्म दिला म्हणून.
       तू पृथ्वीतलावरील सर्व शिक्षकांचा अपमान केला आहेस. तुला जरा जरी लाज असेल तर तर समस्त शिक्षक जातीची माफी मागशील.
   संघटना तुझ्या विरोधात  आणि  *लोकपत्र* च्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करेल.फौजदारी दाखल करेल.
      तू माफी मागणार नाहीस - म्हणून तुझा *जाहीर निषेध*
************************************
      *राजन कोरगांवकर*
           राज्य उपाध्यक्ष.
*महा राज्य प्राथ शिक्षक समिती*
************************************


@६

पत्रकार हा समाजभिमुख असावा, वाटेल ते लिहून आपल्या अकलेचे तारे तोडू नये, आधी अभ्यास करावा आणि मग लेखन करावे, ज्या गुरूला आपल्या संस्कृतीत आचार्य देव भव: असा मान आहे ,त्या गुरू बद्दल असे बिनबुडाचे लेखन करणे चुकीचे आहे, शिक्षक ह्या व्यक्ती बद्दल असे वाईट लिखाण करून काय मिळवले, शिक्षकी पेशाचे योगदान लक्षात घेणे गरजेचे आहे, 

@७

मी पण 1 शिक्षक आहे , सध्या सोशल मीडिया तसेच वृत्तपत्र यांमध्ये शिक्षकविरुद्ध असंतोष पसरत आहे .हे लेख 

त्याचंच हे 1 भाग आहे, पत्रकाराने काय लिहिले यापेक्षा तसे का लिहिले या वर आपण विचार  करून चर्चा किंवा कंमेन्ट पाहिजे.

     आपले शिक्षक नसलेले मित्र,भाऊ ,पाहुणे यांना  या लेखविषयी प्रतिक्रिया विचारा  मग सत्य परिस्थिती  लक्षात येईल.

@८

त्या पत्रकारांच्या पेपरपेक्षा तुम्ही शिक्षक लोकांनी या बातमीचे पब्लीसीटी जास्त केली व पब्लीकने पण आमची टर उडवली.    उघडा डोळे पहा नीट.

@९

हा विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती आहे,आपला न चालणारा पेपर प्रकाशझोत मध्ये आणण्यासाठी खटाटोप दिसतो.धिक्कार अशा नीच पत्रकारितेचा.

Post a Comment

0 Comments

close