Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

असर, हेरंब, नामदेव आणि आता तहकीक... आणि शिक्षक... ( प्रसिध्दी मिळविण्याचे सोपे आणि विनामूल्य माध्यम )

हल्ली प्रसिध्दी मिळविण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील काही कळेनासे झाले आहे. प्रत्येकजण प्रसिध्दी साठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत, कोणी सोशिल साईटवर video बनवतात तर कोणी उगाच प्रसिद्ध व्यक्तींवर टीका करताना दिसत आहेत. परंतू हल्ली शिक्षकीपेशाला बदनाम करुन आपले इप्सित साध्य करणारे महाभाग पाहिले की आपला समाज किती रसातळाला जातो आहे हे दिसून येत आहे. *शिक्षकांविरोधात लिहा आणि मोफत प्रसिध्दी मिळवा* असं सुत्र घडताना दिसत आहे. अशा संस्था किंवा व्यक्ती फक्त आपल्या फायद्यासाठी शिक्षकांना बदनाम करत आहेत. प्रथम सारखी संस्था जि.प.शाळांची बदनामी करुन शासनाकडून लाखो रुपये निधी मिळविण्याचा प्रयत्न करते, हेरंब यांनी शिक्षकांच्या विरोधात लेखन करुन शासकीय समित्यांवर नियुक्ती करुन घेतली तर नामदेवराव आपले you tube व व्यावसायिक मार्गदर्शनाचे प्रमोशन करतात. अशातच आताचे हे तहकीक ज्यांच्या लोकपत्र ला कोणी ओळखत नसताना आज अख्खा महाराष्ट्र ओळखू लागला आहे. बिना पैशाचे प्रसिध्दी मिळविण्याचे माध्यम म्हणून शिक्षकांकडे पाहणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी शिक्षकांनी पावले उचलणे गरजेचे आहे. प्रथम ची जसी पोलखोल करण्यात आली तशाच प्रकारे अशा लोकांना प्रसिध्दी मिळू न देता यांच्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी फक्त निषेधाच्या पोस्ट शिवाय वेगळ्या प्रकारच्या उपायांवर  विचार करणे अत्यावश्यक झाले आहे.
वेळीच आपण यातून सावरणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात अशा प्रसंगांना सतत तोंड देत राहावे लागणार आहे.
Be careful get ready 
आदित्य धस 
प्राथमिक शिक्षक 
जि.प‌.शाळा लांजा नं.५ 


Post a Comment

0 Comments

close