Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

50 % उपस्थिती ची अट रद्द होणार?

कोविडच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे मुंबई व मुंबई उपनगर क्षेत्रातील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेज ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सर्व आयुक्तांनी घेतलेला आहे. विधिमंडळ अधिवेशन सुद्धा त्यामुळेच फक्त २ दिवसाचच होणार आहे. गर्दी होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यायची आहे. ही बाब लक्षात घेवून मुंबई उपनगर क्षेत्रातील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा पुन्हा एकदा द्यावी अशी मागणी शिक्षक भारती चे मा. कपिल पाटील यांनी केली आहे.

           50% उपस्थितीच्या सक्तीमुळे शिक्षकांना प्रवास करुन विद्यार्थी नसतानाही शाळेत यावं लागतं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावरही परिणाम होत आहे. ऑनलाईन शिक्षणाला त्यामुळे न्याय देता येत नाही. गर्दीतून केलेल्या प्रवासामुळे शिक्षकांच्या स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या आरोग्यासही धोका संभवतो. मुंबई उपनगर क्षेत्रात जवळपास ४० हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत. ५०% उपस्थितीच्या सक्तीमुळे त्यांना प्रवास करावा लागत आहे.
सद्यपरिस्थितीचा विचार करता ५०% उपस्थितीची सक्ती करण्यात येवू नये याबाबत कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
हे ही वाचा.

Post a Comment

0 Comments

close