Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इयत्ता नववी ते अकरावीचे विद्यार्थी होणार विनापरीक्षा पास. तमिळनाडू सरकारचा निर्णय..

राज्य सरकारने कोविड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. पलानीस्वामी यांनी बुधवारी ही घोषणा केली.

तामिळनाडूतील शाळा १९ जानेवारीपासून उघडण्यात आल्या होत्या. दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले होते. कोविड१९ च्या संसर्गजन्य परिस्थिती मुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालक व विद्यार्थी यांना परीक्षा कधी व कशा होतील हा प्रश्न सतावत होता. आता परीक्षा न घेता इयत्ता ९ वी ते ११वी पर्यंत चे विद्यार्थी परीक्षा न घेता वरच्या वर्गात प्रमोट करण्याच्या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीसामी यांनी विधानसभेत जाहीर केले की तामिळनाडूमधील 9 वी, 10 व 11 वीचे विद्यार्थी सामान्य परीक्षा न घेता उत्तीर्ण होतील. तामिळनाडू विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री पलानीसामी यांनी प्रश्नोत्तरानंतर नियम 110 अंतर्गत नोटिसा बजावल्या. त्यात 9 वी, दहावी आणि अकरावीचे विद्यार्थी सर्वसाधारण परीक्षेशिवाय उत्तीर्ण होण्याची घोषणा केली आहे. इयत्ता 12 वीच्या सर्वसाधारण परीक्षेची तारीख यापूर्वीच जाहीर केली गेली आहे. ही परीक्षा 3 मेपासून घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

इयत्ता - १०वी विषयनिहाय आराखडा व प्रश्नपत्रिका संच pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 



मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते की कोरोना पसरल्यामुळे दहावीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतील. तसेच यावर्षीही 9 वी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण परीक्षा उत्तीर्ण होण्याची घोषणा करण्यात आली आहे.

बारावीची परीक्षा कधी होणार? 

राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रकही राज्य मंडळाने जारी केले आहे. परीक्षा ३ मे ते २१ मे दरम्यान आयोजित केली जाईल. ३ मे पासून भाषा विषयाच्या पेपरपासून सुरू होणार आहेत आणि २१ मे ला केमिस्ट्री, अकाउंटन्सी आणि जॉग्रफी पेपरने समाप्त होणार आहेत. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल. परीक्षा सकाळी १० ते दुपारी १.१५ पर्यंत आयोजित केली जाईल.

इयत्ता - १०वी विषयनिहाय आराखडा व प्रश्नपत्रिका संच pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


Post a Comment

0 Comments

close