Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेचा निकाल जाहीर... डोंबिवली चा वैभव हरिहरन देशात दुसरा

ICAI CA Result Jan 2021 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया कडून घेतल्या जाणाऱ्या सीएच्या अंतिम आणि सीए फाउंडेशन जानेवारी 2021 च्या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत.


आयसीएआय सीए फाऊंडेशन आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल (ICAI CA Foundation Result 2021) अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर उपलब्ध आहे. सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आपला निकाल आयसीएआय शिवाय caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटसवर सुद्धा पाहता येईल. तसेच विद्यार्थ्यांना आपला निकाल मोबाईवरसुद्धा पाहता येईल. (ICAI CA result January 2021 declared check result on mobile ) 

दहावी व बारावी साठी प्रश्नपेढी संच


निकाल कसा पहावा? 

मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वेबसाईटवर निकाल कसा पाहावा?

  • सर्वात आधी icaiexam.icai.org , caresults.icai.org किंवा icai.nic.in या वेबसाईटवर जा. 
  • यानंतर होमपेजवर आल्यानंतर Latest notification वर क्लिक करा. 
  • त्यानंतर CA Result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमजा रजिस्ट्रेशन नंबर, चार अंकी पिन नंबर आणि रोल नंबर टाका. 
  • तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर ICAI CA Final किंवा CA Foundation परीक्षेचा निकाल दिसेल. 
  • तिथून तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करु शकता. 

CA फायनल, फाउंडेशन जानेवारी परीक्षेचा निकाल

या परीक्षेला देशभरातून नऊ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती. यापैकी अवघे सहा टक्के म्हणजे ५९२ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. जुन्या अभ्यासक्रमात दोन्ही ग्रुप घेऊन तीन हजार ११६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, यापैकी अवघे १.४१ टक्के म्हणजे ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचबरोबर फाउंडेशन परीक्षेचा निकालही जाहीर झाला असून या परीक्षेला बसलेल्या २७ हजार ८०८ विद्यार्थ्यांपैकी २४.८९ टक्के म्हणजे सहा हजार ९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार

विद्यार्थ्यांना जर सीए फाऊंडेशन आणि सीए इंटर निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना दोन मेल उपलब्ध करुन दिले आहेत. 

foundation_examhelpline@icai.in

intermediate_examhelpline@icai.in 

या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.

डोंबिवलीचा वैभव हरिहरन देशात दुसरा

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल परीक्षा (जुना आणि नवा अभ्यासक्रम) आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर केला. फायनल परीक्षेत डोंबिवलीचा वैभव हरिहरन देशात दुसरा आला आहे. ही परीक्षा जानेवारी २०२१मध्ये आयोजित करण्यात आली होती.

वैभवला हरिहरन याला ८०० पैकी ६०१ गुण मिळाले असून रायपूरचा भ्रमर जैन ६११ गुणांसह देशात पहिला आला. यापूर्वी २०१७मध्ये डोंबिवलीच्या राज शेठ याने सीए परीक्षेमध्ये देशामध्ये पहिला येण्याचा मान मिळवला होता. 

वैभव हरिहरनचे कुटुंब व शिक्षण

वैभव हरिहरन याचे वडील निवृत्त बँक कर्मचारी तर आई खासगी शाळेमध्ये शिक्षिका आहे. डोंबिवली पूर्वेतील खंबालपाडा परिसरात हरिहरन कुटंब राहते. लहानपणापासूनच हुशार असलेला वैभव याने डोंबिवलीतील हॉली एंजल शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. तो पोदार कॉलेजात शिकत आहे. करोनामुळे परीक्षा पुढे ढकलणे, अभ्यासक्रमात बदल या साऱ्या तणावाचा सामना करत वैभवने अभ्यास केला. वैभव दिवसातील १४ ते १८ तास अभ्यास करत असे.

वैभव हरिहरनचा विद्यार्थ्यांना संदेश

देशामध्ये दुसरे येऊ हा विचार केला नव्हता, असे सांगत आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरू आणि मित्रांना असल्याचे वैभव सांगतो. आम्ही मित्रमैत्रिणींनी लॉकडाउन काळात फोन करून एकमेकांचे मनोबल वाढवल्याचे तो सांगतो. 'शिस्त आणि सातत्य हे माझ्या यशाचे गमक आहे. अभ्यास करण्याबरोबरच ब्रेकही आवर्जून घ्यायला हवा. मी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्यामागे सगळ्यांचा हातभार आहे. असे वैभवने सांगितले. 


Post a Comment

0 Comments

close