Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

11वी CET परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता...?

राज्य शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशासाठी आयोजित केलेल्या सीईटीचा वाद न्यायालयात पोहोचल्याने 11वी CET परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या  टप्यामध्ये  सामाईक  प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या  उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.

11 वी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती, नोंदणी व अर्ज करणे. सविस्तर माहिती पहा.

ही CET परीक्षा महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असून यामध्ये इंग्रजी 25, गणित 25, विज्ञान 25 व समाजिक शास्त्र 25 असे एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतील. यासाठी इयत्ता 10वीचा महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करावा लागणार असल्याने cbse  व icse  बोर्डात अध्ययन  करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे कठिण होणार आहे.  त्यामुळे केंद्रीय मंडळांच्या पालक आणि इतर संघटनांकडून उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 4 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याने या दरम्यान सुरू असलेली सीईटीची नोंदणी अडचणीत येईल की काय अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 11 वी प्रवेश परीक्षा CET साठीचा विषय व घटकनिहाय अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

11 वी CET परीक्षा कशी होईल? परीक्षेचे स्वरुप / तसेच प्रवेश प्रक्रिया कशी होईल? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. 


केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश या सीईटीत करण्यासाठी न्यायालयाने निर्देश दिल्याने सरकारची मोठी अडचण होणार असून यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Post a Comment

0 Comments

close