शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. 1ली ते इ. 12वीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला होता. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून 100% अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासंबंधी शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे.
मार्च २०२० पातून कोविड १९ या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. दरवर्षी साधारणतः जून मध्ये सर्व राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. तथापि सन २०२१-२२ मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरु करता आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरु करता न आल्यामुळे विहीत वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणेबाबत समस्या निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला असून शाळा नियमित सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी 100% अभ्यासक्रम संपूर्ण अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता १ ली इयत्ता १२ वी चा २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आला होता. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता सुद्धा सन २०२०-२१ प्रमाणे २५% पाठ्यक्रम कमी करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी पुढील लिंक वरुन डाउनलोड करुन घ्या.
शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी 25% कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम डाउनलोड करा.
इ.१ली ते इ.८वी साठी कमी केलेला अभ्यासक्रम - Click Here
इ.9वी ते 10वी साठी कमी केलेला पाठ्यक्रम - Click Here
इ.11वी ते इ.12वी साठी कमी केलेला पाठ्यक्रम - Click Here
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कमी केलेला पाठ्यक्रम
3 Comments
And what about 10th class how much portion they are getting out?
ReplyDeleteAnd what about 10th class how much portion they are getting out?
ReplyDeletegopalrathod97@gmail.com
ReplyDelete