Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

11वी CET परीक्षेच्या अर्जातील चुकलेल्या माहितीची दुरुस्ती करता येणार

इयत्ता 11 वी च्या प्रवेशासाठीची सामाईक परीक्षा CET ही शनिवार दि. २१ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या अर्जातील चुकलेल्या माहितीची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे पूर्वी 20 जुलै ते 26 जुले पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतू तांत्रिक कारणास्तव ही नोंदणी प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. पुन्हा नव्याने सोमवार दि. २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सुविधा पुनःश्च उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर सुविधा दि.०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध असेल.

सदर अर्ज भरताना काही चूका झाल्या होत्या. त्या चुका दुरुस्त करण्याची सुविधा प्राप्त करण्यासंबंधी वारंवार विचारणा करण्यात येत होती. त्या अनुषंगाने 11वी CET परीक्षेच्या अर्जातील दुरुस्ती आता करता येणार आहे. यामध्ये अर्जातील ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, परीक्षेचे माध्यम, पत्ता, परीक्षा केंद्र तसेच sebc व ews प्रवर्गाबाबत माहितीत बदल करता येणार आहे.


इ. 11 वी प्रवेशासाठी CET परीक्षेचे स्वरुप


१) सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/ पेपर असेल. 

२) परीक्षेचा कालावधी 2 तास राहील. 

२) या परीक्षेत इंग्रजी 25, गणित 25, विज्ञान 25 व समाजिक शास्त्र 25 असे एकूण 100 प्रश्न विचारले जातील.

३) परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. 

४) प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल. 

५) परीक्षा O.M.R. आधारीत असेल.

11th CET Syllabus - 

11वी CET परीक्षेस गेल्या वर्षी 25% कमी केलेल्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. यामध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या चार विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील. 

11 वी प्रवेश परीक्षा CET साठीचा विषय व घटकनिहाय अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

11 वी CET परीक्षा कशी होईल? परीक्षेचे स्वरुप / तसेच प्रवेश प्रक्रिया कशी होईल? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. 

Post a Comment

0 Comments

close