Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या - शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड

शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) म्हणजेच NAS Exam 2021 होणार आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिलेले आहेत. 

शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) म्हणजेच NAS Exam 2021 होणार आहे. या परीक्षेचे आयोजन केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत केले जात आहे. NAS Exam एकाचवेळी संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात येत आहे. 

या सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील तसेच NAS सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य आणि संबंधितांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गायकवाड यांनी सर्वेक्षणाच्या तयारीबाबत संवाद साधला आणि आढावा घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य प्रकल्प संचालक राहूल द्विवेदी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम. डी. सिंह, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण व शहरी भागातील शाळा 10 ऑगस्ट च्या शासन निर्णयानुसार सुरु आहेत. असे असले तरी सर्वेक्षणासाठी निवडलेल्या सर्व व्यवस्थापन, माध्यमाच्या शाळांतील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीचे वर्ग दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू राहतील. तसेच सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांतील संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच क्षेत्रीय अन्वेषक यांनी उपस्थित राहणे बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सर्वेक्षणासाठी राज्यातील एकूण 7330 शाळांमधील 2 लाख 34 हजार 55 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. 

Post a Comment

0 Comments

close