राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी "गंमत विज्ञानाची" विज्ञान विषय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.
"गंमत विज्ञानाची" विज्ञान विषयाची ऑनलाईन कार्यशाळा 3 जानेवारी पासून सुरु करण्यात येत आहे. सदर कार्यशाळा राज्यातील इ. 6वी ते इ. 8वी व इ. 9वी ते इ. 10वी तील विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक याच्यासाठी दर सोमवारी आयोजित करण्यात येत आहे.
विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील सहावी ते दहावीपर्यंत विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयातील निवडक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून व विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
स्वाध्याय उपक्रम | वेब लिंक | स्वाध्याय ॲप | Conveginus app विभागनिहाय लिंक - Click Here
विज्ञान विषयाची ऑनलाईन कार्यशाळा 17 जानेवारी इ. 6वी ते इ. 8वी - श्वसनसंस्था
विज्ञान विषयाची ऑनलाईन कार्यशाळा 17 जानेवारी इ. 9वी ते इ. 10वी - भिंगे आणि त्यांचे उपयोग
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे.
0 Comments