इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या 'स्टार्स' (STARS- Strengthening Teaching-Learning and Results for States Program) प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे. या प्रकल्पाची सुरुवात देशातील केरळ, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व ओडिशा या सहा राज्यात झाली आहे.
मंथन परीक्षा 2024 गुणवत्ता यादी पहा. Manthan Exam 2024 Merit List PDF.
केंद्र शासनाने नवीन शिक्षण प्रणाली (NEP 2020 ) मध्ये या 'स्टार्स' प्रकल्पाला समाविष्ट केले आहे. त्याच अनुषंगाने प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र व राज्य शासनाने संयुक्त सहभागाने यावर्षी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरुवात प्रथम महाराष्ट्र राज्यातून करण्यात आली.
https://chat.whatsapp.com/Dc3ZZLSljoUHTuH9rZml1F
शाळापूर्व तयारी प्रशिक्षण
सन 2024-25 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र शासन, यांचे मार्फत शाळापूर्व तयारी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विभागस्तर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षकांचे तालुकास्तर प्रशिक्षण व शाळापूर्व तयारी मेळावे आयोजन करणेसाठी शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचे केंद्रस्तर प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे.
शाळापूर्व तयारी मेळावा क्र. 1 व 2 आयोजन करणेबाबत
शाळापूर्व तयारी मेळावा आयोजन पहिला मेळावा 15 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मेळावा क्र. 2 चे आयोजन जून महिण्यात करण्यात येणार आहे. दोन्ही मेळाव्यादरम्यान 1 ते 8 आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करावी.
शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा 2024-25 आयोजन करणेबाबत परिपत्रक PDF - Click Here
शाळापूर्व तयारी अभियानाचा उद्देश
मागील दोन वर्षांपासून कोविडा9 च्या प्रकोपात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाला. पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्रदेखील बंद आहेत. त्यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणारे बालके व इयत्ता पहिलीत दाखल असलेले बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झाले नाही त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरु होणेपूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी हा अभियान मदत करणार आहे.
शाळापूर्व तयारी अभियान स्टॉल
उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात. सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे : १) नोंदणी (रजिस्ट्रेशन), २) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास), ३) बौद्धिक विकास, ४) सामाजिक आणि भावनात्मक विकास, ५) भाषा विकास, ६) गणनपूर्व तयारी, ७) पालकांना मार्गदर्शन
मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #ShalapurvaTayariAbhiyan२०२४, व #शाळापूर्वतयारीअभियान२०२४ या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रच्या http://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.
सन 2024-25 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल करण्यासाठी वय निश्चिती बाबत शासन निर्णय - Click Here
शाळापूर्व तयारी अभियान मेळावा आयोजनासाठी PDF
शाळापूर्व तयारी अभियान मेळावा आयोजनासाठी PDF
अ.नं. | तपशील | डाउनलोड |
---|---|---|
1 | शाळापूर्व तयारी प्रशिक्षण बाबत शासन परिपत्रक | Click Here |
2 | शाळापूर्व तयारी मेळावा आयोजन स्टेप्स | Click Here |
3 | शाळापूर्व तयारी मेळावा BANNER | Click Here |
4 | शाळापूर्व तयारी पोस्टर्स | Click Here |
5 | शाळापूर्व तयारी - शाळेतील पहिले पाऊल पुस्तिका | Click Here |
6 | शाळापूर्व तयारी बालकांसाठी वर्कशीट | Click Here |
7 | शाळापूर्व तयारी विकासपत्र (मूल्यमापन शीट) | Click Here |
8 | शाळापूर्व तयारी पालकांसाठी आयडिया कार्ड | Click Here |
9 | शाळापूर्व तयारी स्वयंसेवक सहभागी प्रमाणपत्र | Click Here |
10 | शाळापूर्व तयारी घोषवाक्ये | Click Here |
या अभियानात शाळा स्तरावर इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता तपासल्या जाणार आहेत. ज्या क्षमतामध्ये त्यांना मदतीची गरज आहे त्या क्षमतांमध्ये पुढील दोन महिन्यांत आईद्वारे घरीच मार्गदर्शन होऊन वाढ करण्यात येणार आहे. याबाबत पालकांचे समुदेशन करण्यात येणार आहे. यामध्येच पालक, आई, वडील हेच विद्यार्थ्यांचे शिक्षक होणार आहेत. तर शाळांमधील शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, माजी विद्यार्थी, केंद्रप्रमुख, तालुका, जिल्हा पर्यवेक्षीय यंत्रणा त्या बालकांकडे वेळोवेळी भेट देणार आहे व मार्गदर्शन करणार आहेत. या पद्धतीने विद्यार्थ्यांची पूर्व तयारी करून पुढील सत्रासाठी त्याला पहिल्या वर्गात दाखल करण्यात येणार आहे.
0 Comments