Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक बदल्या 2022 | VC / राज्यस्तरीय बैठकीमधील अपडेट. तसेच मागील सर्व बैठका / VC update पहा.

जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया 21 एप्रिल च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीने होणार असून सदर बदल्याचे पोर्टल 9 जून पासून सुरु करण्यात येत आहे. 

 

Teacher's Transfer Portal Login / Application - Click Here




VC 7th - जिल्हांतर्गत शिक्षक बदली 2022 VC अपडेट 08.09.2022

1) अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाबाबत
2) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्तीबाबत
3) सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या पसंतीक्रमाबाबत
4) क्षेत्रवाढीमुळे नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या शाळांबाबत / बंद शाळांबाबत
5) समानीकरणाबाबत
6) नवनिर्मित जिल्ह्यात सेवा हस्तांतरीत झालेल्या शिक्षकांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकाबाबत
All vc update 
VC अपडेट 8 सप्टेंबर 2022  PDF - Download



VC 6th - शिक्षक बदली 2022 VC अपडेट 21.07.2022

१} ज्या जिल्ह्यातील माध्यमिक  शाळांतील प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षक यांची नोंद झाली नसेल तर अशा शिक्षकांची वैयक्तिक माहिती राज्यस्तरावरून मिळणाऱ्या ॲडिशन शीट मध्ये द्यावी. ज्या शिक्षकांचे अद्यापपर्यंत अपडेटेशन झाले नसेल त्यांची माहिती गोल्डन शीट मध्ये आज रात्री १२ वाजेपर्यंत द्यावी.

२} माध्यमिक शाळांतील ॲडिशन होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची माहिती उद्या रात्री १२ वाजेपर्यंत आभासी शाळेतून बी.ई.ओ लॉगीन वर द्यावी.

३} आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर वरील सर्व युजर डी - ॲक्टिव्हेट होतील.

४} कोणत्याही परीस्थितीत रोस्टर अपडेट करावे.

५} ज्या जिल्ह्यात रोस्टर काम पूर्ण वा मंजूर झाले नाही अशा सर्व जिल्ह्यांनी सन २०११ व सन २०२२ च्या रोस्टरची तफावत काढून जे फायनल रोस्टर तयार होईल ते मंजुरी मिळाली नसल्यास माहिती करेक्ट आहे असे वाटल्यास मा.सी.ई.ओ यांची परवानगीसाठी स्वाक्षरी घेऊन अपलोड करावे. याबाबत आर.डी.डी कडून सूचना मिळतील.

६} आंतरजिल्हा बदली फॉर्म कोणत्याही एकाच केडरमध्ये भरावा.

७} एन.ओ.सी बाबत ज्या जिल्ह्यात आपणांस बदली करून जायचे असेल त्या जिल्ह्याची एन.ओ.सी असावी केवळ स्वजिल्ह्याची एन.ओ.सी असून चालत नाही.

८} एन.ओ.सी कितीही जूनी असली तरी अर्ज करू शकता.

९} २२/०७/२०२२ रात्री १२ नंतर कोणतेही ॲडिशन करू नये.

१०} शेवटचे दोन दिवस असल्याने ॲडिशन अपडेटेशन करून घ्यावे.

११} अवघड क्षेत्राच्या याद्या अपडेट कराव्यात.

१२ } जर अवघड क्षेत्राच्या याद्याबाबत काही अडचणी असतील तर त्या निकाली काढाव्यात.

१३} आंतरजिल्हा बदलीमध्ये एन.ओ.सी ला प्राधान्य आहे.

१४} रोस्टरमध्ये ई.डब्ल्यू.एस च्या जागा ओपन धराव्यात.

१५} क्लियर व्हॅकंसी व कंपल्सरी व्हॅकंसी यादी तयार ठेवावी.

१६} २०२१-२०२२ च्या ज्या जिल्ह्यात संचमान्यता पूर्ण नाहीत त्यांनी जिल्हास्तरावरून तात्काळ संपर्क करावा. 







VC 5 - शिक्षक बदली 2022 VC अपडेट 06.07.2022


शिक्षक बदल्या बाबत काल VC झाली त्यामधील ठळक मुद्दे👆👆👆👆👆👆👆👆👆

प्रत्येक जिल्ह्याची रोस्टर ची अचूक माहिती मेल वरून मागवली.(विलंब टाळण्यासाठी यापूर्वीच सूचना दिल्या होत्या.)

ती माहिती कंपनीला देऊन फेज 2(आंतरजिल्हा बदली प्रक्रिया) सुरु करण्याबाबत सूचना देण्यात येतील असे सांगितले.

31 जुलै पर्यन्त मुदत घेतली असल्याने अन्य तांत्रिक बाबींची अडचण येणार नाही.

जिल्हानंतर्गत बदल्या वेळेत होण्यासाठी यंदा प्रत्येक संवर्गला कालावधी कमी करण्यासाठीचा शासन निर्णय काढला असल्याबाबत सांगण्यात आले.
1) बदल्यांना 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ
2) शिक्षकांसाठी profile अपडेट करणे बंद झालेले असून BEO ना फोर्स ACCEPTANCE द्वारे शिक्षक profile accept करावे लागेल. 
3) शिक्षक प्रोफाईल दुरुस्ती पूर्ण करणे. 


बदली पोर्टल 9 जून पासून सुरु होणार. सदर बदली पोर्टल चे उद्घाटन ग्रामविकास मंत्री यांचे हस्ते होणार आहे. बदली बाबत परिपत्रक डाउनलोड करा. 




शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार! | सॉफ्टवेअर चे डेमो व्हिडिओ पहा. 

🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊

VC 4 - शिक्षक बदली संदर्भात राज्यस्तरीय समितीची बैठक 28 मे 2022


सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रगती, वापरकर्ता चाचणीचे निकाल आणि बदली प्रक्रिया सुरू करण्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीसाठी राज्यस्तरीय समितीची पुणे येथे बैठक झाली. या समितीमध्ये आयुष प्रसाद (पुणे), डॉ. सचिन ओंबासे (वर्धा) आणि विनय गौडा जी सी (सातारा) या जिल्हा परिषदेच्या तीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

1. समितीला असे आढळून आले की सॉफ्टवेअर रोल आउटच्या तीन टप्प्यांपैकी - दोन टप्पे पूर्णपणे विकसित आणि चाचणी केलेले आहेत. करार आणि उद्योग मानकांनुसार ते थर्ड पार्टी सिक्युरिटी ऑडिटसाठी पाठवले जावे.

2. तिसरा आणि अंतिम टप्पा देखील प्रोग्राम केला गेला आहे. वापरकर्त्याची चाचणी आता घेतली जात आहे. काही बारकावे जसे की न्यायालयात प्रलंबित प्रकरण असल्यास काय करावे यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

User Testing Report PDF - Click Here

3. डेटा गुणवत्तेच्या पुनरावलोकनात असे दिसून आले आहे की सुमारे 17,000 शिक्षकांनी चुकीचा डेटा सबमिट केला आहे जसे की डुप्लिकेट फोन नंबर, आधार क्रमांकामध्ये जुळत नाही, सेवा डेटा भरताना चुका इ. प्रत्येक जिल्ह्याला सूचित केले गेले आहे.

4. काही जिल्ह्यांसाठी अद्ययावत आणि मंजूर रोस्टर उपलब्ध नाहीत. आंतरजिल्हा बदलीसाठी वर्गवारीचे रोस्टर आवश्यक आहेत. विभागीय आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांना लवकरात लवकर तयारी आणि मंजुरी देण्यासाठी सूचित केले जाईल.

5. सॉफ्टवेअरचे क्लाउड इंटिग्रेशन पूर्ण झाले आहे. 25,000 समवर्ती हिट्ससाठी फक्त लोड बॅलन्सरची रचना केली जात आहे. जलद सेवांसाठी 1 GBPS समर्पित लाइन प्रदान केली जाईल.

6. सुरळीत आणि पारदर्शक हस्तांतरण प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी, सॉफ्टवेअरमध्ये मॅन्युअल हस्तक्षेपाद्वारे, अखंडतेची उच्च पातळी सुनिश्चित करण्यासाठी राज्यभर प्रतिगुप्तचर क्रियाकलाप केले जातील.

नियोजित वेळेनुसार हे सॉफ्टवेअर १ जून रोजी लाँच करता आले असते. परंतु 27 मे रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेमुळे राज्यातील इतर सर्व बदल्यांसह ही प्रक्रिया होणार आहे.

समितीने विन्सिसच्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या टीमशीही संवाद साधला. डेव्हलपर्सची टीम आठवड्याच्या शेवटी सुट्टी किंवा विश्रांतीशिवाय दररोज रात्री उशिरापर्यंत काम करत आहे. विशेष सूट कलमांच्या संख्येमुळे सॉफ्टवेअर अत्यंत गुंतागुंतीचे आहे. सॉफ्टवेअर शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया स्वयंचलित करते - त्यामुळे केवळ डेटा गोळा करावा लागत नाही तर डेटाच्या आधारे शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय देखील घ्यावा लागतो. विक्रमी वेळेत सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे टीमने कौतुक केले. Vinsys चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री निलेश देविदास हे देखील उपस्थित होते.

शिक्षक हस्तांतरण सॉफ्टवेअर अद्वितीय आहे कारण ते शिक्षकांना, प्राधिकरणाच्या हस्तक्षेपाशिवाय, नियमांच्या संचाच्या आधारे बदली मिळविण्यासाठी आणि मिळविण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. 20,000 हून अधिक शिक्षक आणि शिक्षकांचे प्रतिनिधीत्व असल्याचा दावा करणार्‍या 757 संघटनांच्या नेत्यांशी व्यापक चर्चा केल्यानंतर हे नियम सरकारी निर्णय म्हणून ठरविण्यात आले आहेत. 34 जिल्हा परिषदांमधील 102 तज्ज्ञांनी हे सॉफ्टवेअर नेमके शासन निर्णयानुसार आहे की नाही याची पडताळणी केली आहे. एकदा लाँच झाल्यानंतर, सॉफ्टवेअर प्रशासकीय बदल्यांमुळे किंवा बदलीसाठी विनंती करण्यास पात्र असलेल्या शिक्षकांची आपोआप ओळख होते. शिक्षकांचा डेटा प्रत्येक इतर शिक्षकांना पूर्णपणे दृश्यमान आहे. सोशल ऑडिटची प्रक्रिया आहे. प्रत्येक शिक्षकाने केलेले प्रत्येक क्लिक लॉग केले जाते आणि संपूर्ण पारदर्शकतेसाठी शिक्षकांना उपलब्ध करून दिले जाते. डेटामध्ये थर्ड पार्टी फेरफार करण्यास वाव नाही. शिक्षकांच्या पदस्थापनेचा निर्णय मॅन्युअली नाही तर सॉफ्टवेअरद्वारे नियमानुसार काटेकोरपणे घेतला जातो.

ई-गव्हर्नन्समध्ये हे प्रथमच आहे की जटिल निर्णय घेणे स्वयंचलित केले गेले आणि सॉफ्टवेअर सिस्टमला दिले गेले. सहसा, ऑटोमेशन डेटा प्रमाणीकरणापर्यंत मर्यादित असते. विस्तृत ई-गव्हर्नन्स डेटाचे संकलन आणि संचयनासाठी आहे; आणि प्रत्यक्षात सॉफ्टवेअरद्वारे निर्णय घेण्याऐवजी अधिकार्‍यांकडून निर्णय घेणे सुलभ करणे. परंतु या प्रकरणात, अधिकार्‍यांची भूमिका सबमिट केलेल्या डेटावरील विवाद आणि हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यापुरती मर्यादित राहिली आहे. हा प्रकल्प डिजिटल पद्धतीने प्रशासनाला नवी दिशा देईल.

🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊

VC 2 - शिक्षक बदली 2022 - VC Update Date 05.04.2022


जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 7 एप्रिल 2021 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.  Click Here

आंतरजिल्हा बदली शासन निर्णय 7 एप्रिल 2021 डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याच्या अनुषंगाने शिक्षक बदल्याबाबतच्या अभ्यासगटातील सर्व सदस्य विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रा.वि.वि.) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ५.४.२०२२ रोजी (VC) बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत झालेल्या चर्चेनुसार शिक्षक बदली सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक ते बदल करणे संदर्भात संचालक विन्सीस सॉफ्टवेअर कंपनी लि. यांना आदेश देण्यात आले आहेत. बदली सॉफ्टवेअर मध्ये कोणते बदल केले जाणार आहेत ते खालील परिपत्रक डाउनलोड करुन पहा. 

VC update PDF 05.04.2022 - Click Here


शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार! | सॉफ्टवेअर चा डेमो व्हिडिओ पहा. 


🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊


सन २०२२ मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. त्याकरिता शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून शिक्षकांचा डाटा प्राप्त झाला असून शालार्थ तसेच सेवार्थ प्रणालीतील डाटा अद्ययावत नाही. सदरचा डाटा अद्ययावत करणे, संदर्भाधीन शासन निर्णय, शासनपत्रामध्ये दिलेल्या निर्देशानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत तसेच सदर बदलीच्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य समस्यांबाबत अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १७.३.२०२२ रोजी दुपारी ४.०० वा. V.C. द्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती.

VC 1 - शिक्षक बदली VC 17.03.22 मधील महत्त्वाचे अपडेट व मुदत


1) UDSIE अपडेट व दुरुस्ती करणे. 25 मार्च
2) शाळा नोंदणी व दुरुस्ती. 25 मार्च
3) शिक्षक डाटा चेक करणे 25 मार्च
4) अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे. 1 एप्रिल
5) user testing 1 एप्रिल
6) समानीकरण धोरण जाहीर करणे 25 एप्रिल
7) रोस्टर अपडेट करणे. 15 एप्रिल
8) आंतरजिल्हा बदली आदेश - बदली होईपर्यंत / सेवानिवृत्त होईपर्यंत वैध राहील. 
9) आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्ती साठी 10% ची अट राहील. 
10) संपूर्ण अपडेटसाठी खालील PDF डाउनलोड करा. 


Join WhatsApp group


सदर बैठकीस अधिकारी व सॉफ्टवेअर कंपनी चे उपस्थित राहणार आहेत. यामध्ये 

१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व) 

३) उप सचिव (मा.तं.क.), ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई. 

४) श्री. अच्युत इप्पर, कक्ष अधिकारी, ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई. 

५) श्री.निलेश देवदास, विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे.

Join WhatsApp group

Post a Comment

0 Comments

close