Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

SLAS Survey Exam in maharashtra Schools 2023 | State Level Achievement Survey Exam - 'स्लॅस' सर्वेक्षण - सुमारे बारा हजार शाळांत 24 मार्च 2023 रोजी होणार अध्ययन संपादणूक टेस्ट

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले होते. राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण (नॅस) करण्यात आले होते. त्यानंतर आता 24 मार्च 2023 रोजी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS Survey) शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे.


राज्यात तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे 'स्लॅस'चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. हे सर्वेक्षण हे मराठी माध्यमाच्या प्रथम भाषा मराठी गणित या विषयांचे करण्यात येणार आहे. राज्यभरातील इयत्ता तिसरीच्या ३ हजार ७५६, पाचवीच्या ४ हजार ५० तर आठवीच्या ४ हजार १२७ शाळांमध्ये स्लॅस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यातील एकूण ११ हजार ९३३ शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने निवडण्यात आलेल्या शाळेचा पट, माध्यम यांची पडताळणी करून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, मनपा स्तरावर शिक्षणाधिकारी आणि संबंधित तालुका समन्वयक यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे.

SLAS Exam - State Level Achievement Survey Exam 2023

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (स्लॅस) साठी जिल्हानिहाय शाळा


स्लॅस सर्वेक्षणाचा उद्देश

'स्लॅस' सर्वेक्षणात तिसरी, पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी भाषा विषय आणि गणित यासंबंधी विद्यार्थ्याचे ज्ञान तपासले जाणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS Survey) दिनांक 24 मार्च 2023

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS Survey) वेळ सकाळी 9:00 ते 11:00 पर्यंत

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS Survey) परीक्षा दिनांक बाबत परिपत्रक डाउनलोड करा. Click Here






State level Achievement Survey Model Question Paper

अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नसंच

Class 1st - Click Here
Class 2nd - Click Here
Class 3rd - Click Here
Class 4th - Click Here
Class 5th - Click Here
Class 6th - Click Here
Class 7th - Click Here
Class 8th - Click Here

Post a Comment

0 Comments

close