येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात 'एक राज्य, एक गणवेश योजना' राज्य सरकार राबविण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व सरकारी शाळांना एकच गणवेश लागू असेल.
मात्र, काही शाळांनी या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
शासन निर्णय 08 जून 2023 - पुढील वर्षापासून मिळणार शासनामार्फत गणवेश, शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या गणवेशाबाबत मार्गदर्शक सूचना
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
1. प्रस्तुत योजनेंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा. यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वितरीत करावा.
2. मोफत गणवेश योजनेंतर्गत अनेक शाळांनी व कापड उद्योजकांनी विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय सन २०२३-२४ या वर्षासाठीचे गणवेश तयार करण्याचे काम केले आहे. सदर तयार गणवेशामुळे संबंधिताचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समितीस उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठी एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावा.
3. विद्यार्थ्यांना उर्वरित एक गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट / पँट तसेच, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची) शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा. प्रस्तुत गणवेशाबाबतची सर्वसाधारण रचना सोबत परिशिष्ट अ मध्ये जोडली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप (Shoulder Stripe) व दोन खिसे (Double Pocket) असणे आवश्यक आहे.
शालेय गणवेश नमूना ड्रेस पहा.
4. स्काऊट व गाईड विषयासाठी आवश्यक असणाऱ्या गणवेशामधील टोपी व स्कार्फ याबाबत वेगळ्याने आदेश निर्गमित करण्यात येतील.
5. स्काऊट व गाईडच्या गणवेशाबाबत आवश्यक ती सर्व माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने सर्व संबंधितांना उपलब्ध करुन देण्यात यावी.
6. स्काऊट व गाईड या विषयाच्या तासिका आठवडयातून दोन दिवस असतात. त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते. त्यामुळे मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी स्काऊट व गाईड विषयास अनुरूप उपलब्ध करुन देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील. तसेच, उर्वरित सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा.
7) पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन २०२४-२५ पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करु नये. याबाबतच्या आवश्यक त्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
शासन निर्णय 08 जून 2023 - पुढील वर्ष 2024-25 पासून मिळणार शासनामार्फत शालेय गणवेश - शासन निर्णय डाउनलोड करा.
या योजनेमुळे यंदा राज्यात २५ हजार सरकारी शाळांतील ६४ लाख २८ हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. काही शाळांनी कपड्यांची ऑर्डर दिल्यामुळे अशा शाळांमध्ये शाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार, असे तीन दिवस परिधान करतील, तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, असे तीन दिवस परिधान करतील, असे केसरकर यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक वर्षातील लागू होणारी नवीन पाठ्यपुस्तके डाउनलोड करा. Click Here
शासन परिपत्रक - शालेय गणवेश 2023-24 बाबत महत्त्वाच्या बाबी
भारत सरकारच्या समग्र शिक्षा अंमलबजावणी आराखडयातील नमूद निकषानुसार मोफत गणवेश योजना हो शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनु. जाती मुले, अनु.जमाती मुले तसेच दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांना लागू आहे.
0 Comments