केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्हद्वारे दि. 07 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये प्रौढ व निरंतर शिक्षण या संबंधी उल्लेख आहे. त्यातील परिच्छेद क्र. २१.४ मध्ये नमूद करण्यात आले आहे की विशेषतः प्रौढ शिक्षणासाठी भक्कम आणि नाविन्यपूर्ण शासकीय उपक्रमाद्वारे तसेच, समुदाय सहभाग आणि तंत्रज्ञानाचे सहज आणि फायदेशीर एकत्रीकरण केले जाईल, ज्यामुळे १०० टक्के साक्षरतेचे उदिष्ट लवकरात लवकर साध्य करणे शक्य होईल. त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने आणि २०२१ च्या अर्थसंकल्पीय घोषणेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार प्रौढ शिक्षणाची एक नवीन योजना नवभारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. सदर योजनेचा कालावधी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ असा आहे. सदर योजना केंद्र व राज्यशासन यामधील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात लागू करण्यात आलेली आहे.
ऑनलाईन सर्वेक्षणासाठी मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे सदर मोबाइल ॲपचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्हद्वारे दि. 07 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. सबब आपण व आपले अधिनस्थ असणारे नवभारत साक्षरता योजनेचे काम पाहणारे अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय स्तरावरील सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा, शालेय मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सदर प्रशिक्षणासाठी उपरोक्त कालावधीत ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्ह या समाज माध्यमावर उपस्थित राहावे.
Online training on Ullas Nav Bharat Literacy Program and Ullas App
केंद्र शासनाने युट्युबद्वारे विषयांकित प्रकरणी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून सदर प्रशिक्षणास वेळेवर जॉईन व्हावे. सदर प्रशिक्षणास सर्व संबंधितांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. - डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)
नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी विकसित करण्यात आलेल्या उल्लास ॲप चे प्रशिक्षण
सकाळी 10:00 वाजता
नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचे प्रशिक्षण 07 सप्टेंबर 2023 Join होण्यासाठी Youtube live लिंक पुढीलप्रमाणे
उल्लास- नवभारत साक्षरता अभियान App डाउनलोड करा. - Click Here
0 Comments