Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थेऐवजी शिक्षकांनीच करणेबाबत शासन परिपत्रक | शाळाबाह्य कामावर शिक्षकांचा बहिष्कार

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण हे सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळाबाहय विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासोबतच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांकडून करावयाचे आहे शासन परिपत्रक

शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई दि. १४/१०/२०२२. अन्वये नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते सन २०२६ २७ या कालावधीमध्ये राबविण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. सदर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता या कार्यालयास्तरावरून दि. ११/०८/२०२३ व दि.४/०७/२०२३ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

YCMOU BEd Registration Link 2023-25 - Click Here

शासन परिपत्रक 28 ऑगस्ट 2023 - नुसार नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या सर्वेक्षणाबाबत सूचना


नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या सर्वेक्षणाबाबत महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये सदरचे सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थामार्फत करण्यात येणार असल्याच्या चूकीच्या बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, असे कोणत्याही प्रकारचे आदेश या कार्यालयस्तरावरून निर्गमित झालेले नाहीत. नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण हे सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळाबाहय विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासोबतच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांकडून करावयाचे आहे, याची नोंद घ्यावी. हे सर्वेक्षण शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत शिक्षकांनी करावयाचे आहे ही बाब कटाक्षाने पाळली जाईल याकडे लक्ष द्यावे.


नवभारत साक्षरता अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करणेबाबत शासन परिपत्रक दि. 28/08/2023 डाउनलोड करा. - Click Here

नवभारत साक्षरता सर्वेक्षणाबाबत शासन परिपत्रक दि. 21/08/2023 अपडेट

जनगणना २०११ मधील उपलब्ध माहितीनुसार या कार्यालयास गावनिहाय निरक्षरांची आकडेवारी प्राप्त झालेली आहे परंतु गावनिहाय निरक्षरांचे नावे अप्राप्त आहे. त्यामुळे अशा निरक्षरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील १५ वर्ष व त्यावरील वयोगटातील साधारणपणे १ कोटी ६३ लक्ष इतकी आहेत. सदर निरक्षर व्यक्तींना मार्च सन २०२७ अखेरपर्यंत साक्षर करण्यासाठी समाजातील विविध घटकांचा स्वयंसेवी पध्दतीने ऑनलाईन नोंदणीव्दारे सर्वेक्षणासाठी व अध्ययन-अध्यापनासाठी सहभाग घेण्यात येत आहे. तरी सदर योजनेच्या माध्यमातून निरक्षर व्यक्तींच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी राज्यातील शिक्षकांचे सर्वेक्षणासाठी सहकार्य अपेक्षित आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील निरक्षरता पूर्णपणे संपुष्टात आणणे शक्य होईल. असे आवाहन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी विजय कोंबे यांच्या निवेदनावर केले आहे. 

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण शिक्षकांऐवजी स्वयंसेवी संस्थेकडून करणेबाबत शासन परिपत्रक दि. 21/08/2023 डाउनलोड करा. Click Hereशिक्षण संचालक महेश पालकर यांनी केलेल्या आवाहनास शिक्षक समितीचा विरोधच, नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यावर शिक्षकांचा बहिष्कार कायम
नवभारत साक्षरता कार्यक्रम बहिष्कार कायमच...

आम्ही *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* सुरूवातीपासून *बहिष्कार* वर ठाम आहोत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्या कुणी दिल्यात..? या कपोलकल्पित बातम्यांना प्रसिद्धी कुणी दिली. *_महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती_* म्हणून आम्ही राज्य शाखेने अधिकृतपणे कुठेही शिक्षकांकडून सर्वेक्षणाचे काम काढून घेतल्याची एकही बातमी किंवा कुठेही पोस्ट टाकली नाही कारण यात कोणतीही सत्यता नाही हे आम्ही स्पष्ट केले होते.
   अनेक बांधवांच्या पोस्ट आल्या किंवा फोन आले त्यावेळी अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगूनही अनेक लोकं बातम्या शेअर करत गेले..  न झालेल्या निर्णयाचे स्वागत करत गेले हीच चळवळीची शोकांतिका आहे.
    आज तर एका संघटनेने मा. शिक्षण मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचा हवाला देऊन काम शिक्षकांकडून काढून घेतले अशी पोस्ट देत मा. मंत्री महोदयांचे आभारही मानले आहे.
   *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* म्हणून सर्वेक्षण *_बहिष्कारावर आम्ही ठाम आहोत._* संचालनालयाने आज २८ ऑगस्ट रोजी काढलेले पत्र म्हणजे संघटनेचे अपयश नसून अशैक्षणिक कामे तसेच शिक्षकांना त्रस्त करण्याच्या मुजोरीचा भाग आहे. 
   शिक्षक बांधवांना अशा जाचातून खरोखरच मुक्ती हवी असल्यास बहिष्कार आणि विरोधाची भूमिका कायम ठेवावी लागेल. 
   शासन-प्रशासन व्यवस्थेकडून कोणतीही मागणी सहज व विनासायास मान्य होईल ही भूमिकाच मुळात स्वप्नरंजन आहे.  
    विजय कोंबे
    राज्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

Post a Comment

0 Comments

close