Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळाबाह्य मुलांसाठी विशेष शोध मोहीम... शाळाबाह्य सर्वेक्षण प्रपत्र अ, ब, क, ड Excel डाउनलोड करा.

सर्व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा असे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले होते त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहिम 23 फेब्रुवारी च्या शासन निर्णयानुसार निच्श्चित केली आहे...


शाळाबाह्य सर्वेक्षण प्रपत्र अ, ब, क, ड Excel sheet मध्ये डाउनलोड करा.   Excel sheet मध्ये तुमचे नाव/ शाळेचे नाव Edit करता येईल.  Touch to Download


कोरोना संकटामुळे शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची शाळेतून गळती रोखण्यासाठी उपाययोजनांची शिफारसही मंत्रालयाने केली आहे.  कोरोना संकटामुळे स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध, त्यांचा शाळाप्रवेश आणि नियमित शिक्षण हा प्रमुख उद्देश आहे. 'शाळाबाह्य मुलांवर करोनासंकटाचा झालेला परिणाम कमी करण्यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने योग्य धोरणाची आखणी करण्याची गरज आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची गळती रोखणे, शाळा प्रवेश वाढविणे, अभ्यासाचे नुकसान भरून काढणे, सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे शक्य होईल,' असे मत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

वाचा - शाळाबाह्य मुलांच्या मदतीला बालरक्षक

शाळाबाह्य मुले (out of school children) शोधून त्यांना शाळेच्या पटावर आणण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश शिक्षण मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने कोरोना साथरोगाचा शिक्षणावर झालेला परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने व्यापक मोहिम हाती घेतली आहे. 

कोरोना संकटामुळे शाळा बंद पण शिक्षण सुरु ठेवण्याचा शासन स्तरावरुन प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत जे विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याच माध्यमातून शिक्षण प्रवाहात दाखल झाले नाहीत अशा मुलांचा शोध घेवून त्यांचा अभ्यास घेतला जाणार आहे.


💥 17 ऑगस्ट पासून सर्वेक्षण सुरु... 

 सर्वेक्षणाची जबाबदारी


📌 ३ ते ६ वयोगट - अंगणवाडी सेविका / मदतनीस


📌  ६ ते १८ वयोगट - प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक


शोध मोहीमेची कार्यपद्धती

१) सदरची शोधमोहिम ही गाव, वाडी, वस्ती, वार्ड या स्तरावर पूर्ण करण्यात यावी. 
२) शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा, तालुका, बीट, केंद्र, गाव स्तर नियोजन करुन सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी बनवावी. 
३) संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करुन मोहिमेचे उद्देश व कार्यपद्धती सांगावी. 
४) १ मार्च पासून सर्वेक्षण सुरु करुन दररोजचा आढावा घेण्यात यावा. 
५) सदर आढावा संकलित करुन पुढे पाठववा. 
६) शाळाबाह्य शोध मोहीमेत १८ वर्षे वयोगटातील दिव्यांग बालकांचा सुद्धा समावेश करण्यात यावा. 

जिल्हास्तर ते वाडी, वस्ती/वार्ड स्तरावरील सविस्तर नियोजन पहा. 

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत अधिक माहितीसाठी शासन निर्णय डाउनलोड करा. 


शोध मोहिमेबाबत व्यापक जनप्रबोधन
 

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहीमेस व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. सोशल मिडिया  whatsApp, Facebook, Instagram, telegram, you tube, च्या द्वारे विविध संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था यांना व्यापक जनप्रबोधन करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. 

 मंत्रालयाने केलेल्या शिफारशी

- क्लासरूम ऑन व्हील्स; तसेच गावस्तरावर छोटे गट करून वर्ग भरविण्याचा पर्याय पडताळावा.

- ऑनलाइन आणि डिजिटल माध्यमे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.

- टीव्ही आणि रेडिओचा शिक्षणासाठी वापर करून शैक्षणिक नुकसान भरून काढणे.

- पाठ्यपुस्तके, गणवेश आणि माध्यान्ह भोजन वेळेत आणि सहजपणे उपलब्ध करणे

- शाळा सुरू झाल्यावर ही मुले वातावरणाशी जुळवून घेतील, याकडे लक्ष देणे.

Post a Comment

0 Comments

close