Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दुष्काळसदृश्य भागातील शालेय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ,

राज्यातील दुष्काळसदृश्य भागातील विद्यार्थ्यांची (इ.10 वी व इ.12वी) परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करणेसाठी ONLINE द्वारे माहिती सादर करण्यास 26 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती करणेबाबत शासन निर्णय 31 मार्च 2024

महसूल व वन विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दिनांक ३१.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यांमध्ये तसेच दि.१०.११.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये पूर्वी जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर १०२१ महसुल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. महसुल व वन विभागामार्फत दुष्काळ जाहीर केलेल्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांच्या संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला आहे.




महसुल व वन विभागामार्फत दुष्काळ जाहीर केलेल्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी फी प्रतिपूर्ती करण्याची योजना कार्यन्वित आहे. सद्यस्थितीत अवर्षणग्रस्त तालुक्यांतील फी माफीसाठी इयत्ता १२ वी मधील २,८४,२०८ विद्यार्थ्यांना रू.१५,८८,२४,९२५/- इतकी तसेच इयत्ता १० वी ३,२८,९१४ विद्यार्थ्यांना रु.१६,१९,६२,५५०/- इतकी रक्कम येते, या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करावयाची झाल्यास सन २०२३-२४ मध्ये वित्तरीत करण्यात आलेली रक्कम वजा जाता एकूण रु.३२,०७,९७,४७५/- इतक्या रक्कमेची आवश्यकता आहे. त्यापैकी एकुण रू. ८.३० कोटी इतका निधीचे पुढील प्रमाणे पुनर्विनियोजन करण्यात येत आहे :-

अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती शासन निर्णय 31 मार्च 2024 डाउनलोड करा. Click Here


परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करणेसाठी ONLINE द्वारे माहिती सादर करणेबाबत



शासनाचे शासननिर्णयानुसार, टंचाईग्रस्त / दुष्काळग्रस्त भागातील इ.10 वी व इ.12वी च्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरून करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुश्काळसदृश्य 40 तालुके व याव्यतिरिक्त 1021 महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविध्यालयांना 'माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रवारी-मार्च 2024 मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी अनुक्रमे  http://feerefund.mh-ssc.ac.in आणि http://feerefund.mh-hsc.ac.in ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंकवर दि. 20 मार्च, 2024 पर्यत माहिती सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.

दहावीच्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्यासाठी लिंक -  Click Here

बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्यासाठी लिंक -  Click Here


विविध शिक्षक संघटनांनी केलेल्या मागनीनुसार विद्यार्थ्याची माहिती प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने, सदर महिती सादर करण्यासाठी दि. 26 मार्च 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविध्यालयांनी दि.26 मार्च 2024 पर्यत ऑनलाईन पध्दतीने माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच या नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. याची नोंद घ्यावी.

दुष्काळी तालुक्याची यादी बाबत शासन निर्णय (29 फेब्रुवारी 2024) डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close