Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Engineering Diploma Admission Registration : पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज सुरु, लिंक - https://poly24.dtemaharashtra.gov.in

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत दहावीनंतर पॉलिटेक्निक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तुकला अभ्यासक्रम पदविका अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना बुधवारपासून (दि. २९) ऑनलाइन माध्यमातून प्रवेश अर्ज करता येणार आहेत. Engineering Diploma Admission Registration : पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज सुरु, लिंक - https://poly24.dtemaharashtra.gov.in


पॉलिटेक्निक प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे पहा. 

DTE Maharashtra admission link



राज्यात येत्या शैक्षणिक वर्षांत तीनशेपेक्षा जास्त संस्थांमध्ये एक लाखाहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. या संस्थांमध्ये प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सध्या ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया करता येणार आहे. 

पॉलिटेक्निक अभ्यासक्रम मराठी इंग्रजी (द्विभाषिक) पर्यायही उपलब्ध आहे. दहावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असून, त्यात सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल या शाखांसाठी प्रवेश घेता येईल. गतवर्षी पॉलिटेक्निक पदविका प्रवेशाला दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली होती.


ऑनलाइन अर्ज भरणे व निश्चित करणे याकरिता उमेदवार त्यांच्या सोयीनुसार ई-स्कुटिनी आणि प्रत्यक्ष स्कुटिनी या पद्धतीची निवड करू शकतात. ई- स्कुटिनीमध्ये कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करता येतील. या प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती https:// dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गतवर्षी ८६ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.


Engineering Diploma Admission  Time Table, important Dates

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, नियोजित तारखा

१. प्रवेशप्रक्रियेसाठी संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड, ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे यासाठी दि. २९ मे रोजी सुरुवात होणार असून, दि. २५ जूनपर्यंत मुदत दिली आहे. 

मुदतवाढ - 01 जुलै पर्यंत करता येतील अर्ज



२. तसेच याच कालावधीत प्रवेशासाठी ई-स्कुटिनी आणि प्रत्यक्ष स्कुटिनी पद्धत निवडलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करता येणार आहे. 

३. दि. २७ जून रोजी तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील.

४. दि. २८ ते ३० जून या कालावधीत गुणवत्ता यादींमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करता येतील. 

५. दि. २ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाणार आहे.


या संकेतस्थळावरून करा अर्ज

उमेदवारांनी https://poly24.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. डीटीई डिप्लोमा ॲडमिशन या ॲपवरूनही अर्ज भरून ते निश्चित करू शकतात.

Engineering Diploma Admission Registration link -

https://poly24.dtemaharashtra.gov.in


पॉलिटेक्निक प्रवेश ऑनलाईन अर्ज लिंक - 


Engineering Diploma Admission Registration prospects download
पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया माहिती पत्रक डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments

close