राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2023-24 या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती.
NMMS Exam 2023-24 Result
Result Link - Click Here
NMNS Result Student Login - Click Here
NMMS Result School Login - Click Here
NMMS Exam निवड यादी / गुणवत्ता यादी 2023-24 डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक 24 डिसेंबर २०२3 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07/०2/२०२4 रोजी पासून पाहता येईल.
विद्यार्थ्यांच्या माहिती मधील दुरुस्ती बाबत
सदर यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १६/०२/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
0 Comments