लहान मुलांसाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी PDF डाउनलोड करा.
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक 1
लोकांचे, लोकांसाठी व लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय.. Government of the people, by the people, for the people ही लोकशाही 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशात लागू झाली आणि लोकांच्या हातात सत्ता आली. भारत एक गणराज्य बनला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेलं भारतीय संविधान आजपासून संपूर्ण देशभर लागू झालं.
आपला भारत देश स्वातंत्र्य, समता व बंधुत्वा यावर आधारित लोकशाही प्रधान राष्ट्र आहे. आज आपला देश 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशवाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
जय हिंद! जय भारत!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक भाषण; टाळ्यांचा होईल कडकडाट - भाषण पहा. Click Here
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक 2
अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हांला भाषण सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.
जे देशासाठी लढले अमर हुत्माते झाले
सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार
देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना मी प्रथम वंदन करतो. . मित्रांनो आज आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
26 जानेवारी 1950 पासून भारत देशाचा कारभार संविधानाप्रमाणे सुरु झाला. हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिण्यासाठी मोठे कष्ट घेतले.
संविधान आहे म्हणूनच आज आपण वेगवेगळ्या जाती-धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखासमाधानाने एकत्र राहत आहोत म्हणून म्हणतो;
चला करूया
संविधानाचा आदर
ज्याने दिला आपणास
जगण्या-शिकण्याचा अधिकार.
जय हिंद! जय भारत!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक 3
अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज आपण सर्वजन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत.
मी आज तुम्हांला मुलीच्या शिक्षणाविषयी माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी आशा बाळगते.
आज आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. त्यामुळे मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सोडू नका. मुलामुलीत भेदभाव करु नका, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी, असे म्हणतात की, एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. सुशिक्षित होते.
एवढे बोलून मी माझे भाषा संपवते
जय हिंद! जय भारत!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक 4
अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रथमतः आपणा सर्वास प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
२६ जानेवारी हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. नवी दिल्ली येथे सकाळी ध्वजारोहण होते. नंतर पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात.. भारताचे वैभव दाखविणारी मिरवणूक काढतात.
या दिवशी संपूर्ण भारतात आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण असते. आपला भारत देश प्रगत व्हावा म्हणून आपण एकोप्याने काम करत असतो. म्हणूच मला म्हणावेसे वाटते
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा
जय हिंद! जय भारत!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
0 Comments