28 फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रामन परिणाम या संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन प्रश्नमंजुषा - Click Here
दि. 21 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 National Science Day 2026 च्या निमित्ताने शाळांमध्ये स्तरनिहाय शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने आयोजित केले जाणार आहेत.
राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 National Science Day 2026 च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे व्हिडिओ, फोटो इतर साहित्य फेसबुक , इंस्टग्राम, ट्विटर इ. समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2026, #nationalscienceday2026 या हॅशटॅगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी.
राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 च्या निमित्ताने आयोजित करावयाचे कार्यक्रम
Programs to be organized on the occasion of National Science Day 2026
Join WhatsApp Group
स्तर पहिला - इयत्ता पहिली ते पाचवी
कार्यक्रम स्वरूप
१. चित्रकला - Click Here
२. पोस्टर निर्मिती
विषय
१. माझी पृथ्वी - Click Here
2. परिसरातील माझे मित्र/सोबती - Click Here
तपशील
चित्रकला / पोस्टर निर्मिती: दिलेल्या दोन विषयांपैकी कोणत्याही विषयावर चित्र / पोस्टर काढून त्याचा फोटो अपलोड करावा.
स्तर दुसरा - इयत्ता सहावी ते आठवी
कार्यक्रम स्वरूप
१. निबंध लेखन
२. वैज्ञानिक रांगोळ्या - Click Here
विषय
१. स्वयंपाकघरातील विज्ञान - 1) Click Here 2) Click Here
२. भविष्यातील दळणवळण - Click Here
3. माझी शाश्वत जीवनशैली - Click Here
4. विज्ञानातील संकल्पना - वैज्ञानिक रांगोळी PDF - Click Here
तपशील
वैज्ञानिक रांगोळी - दिलेल्या विज्ञानातील संकल्पना या विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा. Click Here
स्तर तिसरा - इयत्ता नववी व अकरावी
कार्यक्रम स्वरूप
१. निबंध लेखन
२. फोटोग्राफी/व्हिडिओनिर्मिती
विषय
१. माझा आवडता संशोधक - Click Here Click
2. भविष्यवेधी विज्ञान सफर - Click Here
३. विज्ञानातील गमतीजमती - Click Here
4. जैवविविधता - Click Here
5. विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन - Click Here
तपशील
निबंध लेखन:- दिलेल्या कोणत्याही विषयावर विषयावर १००० शब्दांत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा.
फोटोग्राफी/व्हिडिओ निर्मिती - दिलेल्या कोणत्याही विषयावर ०३ मिनिटांचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा.
स्तर चौथा - प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी
कार्यक्रम स्वरूप
१. वैज्ञानिक प्रतिकृती निर्मिती - Click Here
2. वैज्ञानिक खेळणी निर्मिती
विषय
१. समाजोपयोगी विज्ञान
२. शाश्वत विकास
तपशील
वैज्ञानिक प्रतिकृती / वैज्ञानिक खेळणी निर्मिती दिलेल्या कोणत्याही विषयावर वैज्ञानिक प्रतिकृती किंवा वैज्ञानिक खेळणी तयार करून त्याचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा. वैज्ञानिक प्रतिकृतीची माहिती लिहून त्याचा फोटो आणि, व्हिडीओ अपलोड करावा.



0 Comments