प्रदूषण मुक्त दिवाळी शपथ | प्रदूषण मुक्त दीपावली शपथ | SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. १५.१०.२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
संदर्भ :- १. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे पत्र दि. २२.१०.२०२६ २. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२५८ (ई-१९०५७१३)/एस.डी.४ दि.२८ ऑक्टोबर, २०२६
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक २ च्या शासन पत्रान्वये शासनाने "मा. उच्ब न्यायालय, मुंबई येथे दाखल SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. न्यायालयाने दि. १५.१०.२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांमध्ये ध्वनी व पर्यावरणीय प्रदूषणाबाबत जनजागृती करावयाची आहे. त्या अनुषंगाने दीपावली पूर्वी राज्यातील सर्व शाळांमध्ये /महाविद्यालयांमध्ये प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्याबाबत शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात यावा. यासाठी परिपाठाच्या वेळेचा उपयोग करता येऊ शकेल. शपथेचा मसुदा पुढीलप्रमाणे-
प्रदूषण मुक्त दीपावली शपथ
प्रदूषण मुक्त दिवाळी शपथ
दिवाळी हा आनंद उत्सव आहे आणि या आनंद उत्सवात सभोवतालचे पर्यावरण प्रदूषित होणार नाही. यासाठी आम्ही शपथ घेत आहोत. फटाक्यांमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होते, ते आरोग्याला अपायकारक आहे याची आम्हाला जाणीव आहे. प्रदूषणाचा लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रुग्ण, पशु-पक्षी यांना खूप त्रास होतो. आम्ही आज सर्वजण संकल्प व निश्चय करतो की यावर्षीच्या दिवाळीत आम्ही फटाके वाजवणार नाही. तसेच आमचे मित्र मंडळी, नातेवाईक, कुटुंबीय यांना देखील फटाके न वाजवण्यासाठी प्रवृत्त करू. वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी शपथ मी घेत आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपरोक्त शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात यावा.
त्या अनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय वांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या शासनाच्या सूचना निदर्शनास आणून SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. १५.१०२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत सर्व संबंधितांस आपल्या स्तरावरून सूचित करावे.




0 Comments