Idol Teacher - विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने अशा आयडॉल शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे. त्यानुसार राज्यातील आयडॉल शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.
यासाठी दि. 16/04/2025 शासन निर्णयानुसार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यासाठीच्या जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख हे शिक्षणाधिकारी आहेत.
शासन निर्णय 16/06/2025 अन्वये आयडॉल शिक्षक यांची निवड करून यादी शासनास सादर करणेबाबत या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने गठित करण्यात आलेल्या जिल्हा व तालुका समित्यांनी पात्र शिक्षकांचे मूल्यमापन करुन याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
1) अशा शिक्षकांचा शोध घ्यावा ज्यांच्या शैक्षणिक वर्ष 2024 - 25 मधील त्यांना नेमून दिलेल्या कोणत्याही एका तुकडीच्या बाबतीत त्यांनी शिकविलेल्या सर्व विषयांसाठी वर्गातील किमान 90% विद्यार्थ्यांना सर्व अध्ययन निष्पती प्राप्त आहेत. यासाठी संबंधित शिक्षकांशी चर्चा करण्यास तसेच सदरील बाब संबंधित वर्गात जाऊन तपासणी करण्यास हरकत नाही. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व संपूर्ण पर्यवेक्षीय यंत्रणेची मदत घ्यावी. 15.07.2025
2) उपरोक्त शिक्षकांसाठी संदर्भ क्रमांक 1 अन्वये इतर आठ निकषांची पडताळणी पूर्ण करावी. 25.07.2025
3) सर्व तालुकास्तरीय समितींनी त्यांची गुणांकनासह बनवलेली प्रस्तावित शिक्षकांची यादी जिल्हास्तरीय समितीला द्यावी. 26.07.2025
4) जिल्हास्तरावरून सर्व तालुकास्तरीय याद्यांची पडताळणी करून राज्यस्तरासाठी जिल्ह्यातील 10 सर्वोतम शिक्षकांची यादी गुणांकनासह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला पाठवावी. 02.08.2025
दिनांक 16.04.2025 शासन निर्णयामध्ये यासाठीच्या शिक्षक मूल्यमापनाकरिता बाबी व गुणांकन दिलेले आहे. बाबनिहाय मूल्यमापन निकष सोबत संलग्न आहेत. निकषानुसार गुणांकन कार्यपद्धती अनुसरण्यात यावी. आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही काटेकोरपणे पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
0 Comments