शालार्थ प्रणाली - माहे सप्टेंबर २०२३ चे नियमित वेतन देयक सादर करणेबाबत सूचना. माहे सप्टेंबर २०२३ च्या वेतनापासून शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यतेप्रमाणे मंजूर पदे शालार्थ मध्ये मॅपिंग केल्याशिवाय सप्टेंबर चे वेतन अदा न करणे बाबत आदेशित केले आहे.
शालार्थ प्रणालीमध्ये Post Mapping पूर्ण केल्याशिवाय सप्टेंबर २०२३ चे वेतन देयक (बिल) शालार्थ प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही याची सर्व संबंधित कार्यालयांनी नोंद घ्यावी.
शालार्थ वेतन प्रणालीमध्ये काही जिल्हयामध्ये नियमित वेतनाशिवाय इतर देयकांच्या रकमा जसे की Basic arrears, DA arrears या Active Tab मधून नियमित वेतनापेक्षा अधिकच्या रकमा DDO-1, DDO-2 च्या स्तरावरून आहरित झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आर्थिक शिस्तीचे पालन होताना दिसून येत नाही. आर्थिक शिस्त बिघडू नये म्हणून सन २०२३-२४ मध्ये माहे एप्रिल २०२३ पासून शालार्थ प्रणालीमध्ये पुढील प्रमाणे बदल करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. यास्तव आपणास कळविण्यात येते की, माहे मार्च २०२३ पेड इन एप्रिल २०२३ च्या वेतनापासून नियमित वेतनाशिवाय अन्य बाबीसाठीची रक्कम देयकामध्ये समाविष्ट करता येणार नाही. फक्त नियमित वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, नक्षलग्रस्त भत्ता, आदिवासी भत्ता, शहरपुरक भत्ता, एनपीएस १४ टक्के इत्यादी भत्ते व नियमित वेतनच आहरित होईल अशी व्यवस्था शालार्थ मध्ये करावी. तसेच वरील नियमित वेतनाच्या बाबी वगळता इतर बाबीचे रकाने (टॅब) शालार्थमध्ये पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात यावे. (तात्पुरत्या स्वरूपात टॅब Inactive करण्यात यावे.)
तसेच माहे मार्च २०२३ च्या वेतनामध्ये जर सदर टॅब मध्ये रक्कमा दर्शवून देयके सादर केली असतील तर अशी देयके Reject करण्यात यावीत. जेणेकरून शालार्थ प्रणालीमध्ये आर्थिक अनियमिततेला वाव राहणार नाही.
शालार्थ प्रणाली मधील वेतनाव्यतिरिक्त Tab Inactive करणेबाबत शिक्षण संचालक यांचे परिपत्रक पहा.
Previous Updates
माहे फेब्रुवारी २०२३ पेड इन मार्च २०२३ चे नियमित वेतन देयक सादर करताना मा. शिक्षण संचालक यांचे पत्र दिनांक 14/०२/२०२३ नुसार सर्व लेखाशिर्षांतगत ७ व्या वेतन आयोगाचा १ला , २ रा व 3रा हप्ता देणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. याकरिता शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा सुरू झालेली आहे. त्यासाठी शालार्थ प्रणालीच्या होमपेज वर युजर मॅन्युअल उपलब्ध आहे.
माहे फेब्रुवारीच्या नियमित वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता फरक व ७ व्या वेतन आयोगाचा 1ला, २रा व 3रा हप्त्याचे देयक समाविष्ट करून सदर फेब्रुवारीचे नियमित वेतन देवक दिनांक १५/०२/२०२३ पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करून हार्डकॉपी कार्यालयास सादर करावी लागणार आहे.
शासन निर्णय 07 फेब्रुवारी अन्वये शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ झालेली आहे. त्यानुसार वाढीव मानधन माहे जानेवारी २०२३ च्या फरकासह शालार्थ प्रणालीतून अदा करावे.
फेब्रुवारी २०२३ नियमित वेतन देयक व महागाई भत्त्याच्या फरकासह प्राधान्याने सर्व कर्मचा-यांचे नियमित वेतन काढण्यात यावे. त्यानंतर उर्वरित रकमेतून सातव्या वेतन आयोगाचे हप्ते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि. ०१/ ०२ / २०२३ नुसार ऑफलाईन काढण्याची कार्यवाही करण्यात यावी.
शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि. 01/02/2023 डाउनलोड करा. Click Here
फेब्रुवारी 2023 च्या वेतनाबाबत संचालकाचे परिपत्रक पहा.
शिक्षण संचालक यांचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
0 Comments