व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (ITI) मध्ये प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना 03 जूनपासून आयटीआय साठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना केवळ एकच अर्ज भरता येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास सर्व अर्ज रद्द करून त्यास प्रवेश प्रक्रियेतून बाद केले जाईल. तसेच, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जाची निश्चिती करणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रियेत चार मुख्य फेऱ्यांसह एक समुपदेशन फेरी व खासगी संस्थास्तरीय फेरी अशा सहा फेऱ्या होणार आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच आयटीआय प्रवेशासंदर्भात सविस्तर माहितीपुस्तिका https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीत एक ते शंभर पसंतीक्रम देता येणार आहेत. पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमानुसार संस्था मिळाल्यास त्या संस्थेतच प्रवेश घ्यावा लागेल. अन्यथा चौथ्या फेरीपर्यंत प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :
■ ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे दि. 03 जून ते 30 जून
ITI admission Registration link - Click Here
■ अर्ज स्वीकृती केंद्रात मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे : दि. 05 जून ते 01 जुलै
■ पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करणे : 05 जून ते 02 जुलै
■ प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 04 जुलै (स. 11 वाजता)
■ गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे : 04 व 05 जुलै
■ अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : 07 जुलै
ITI Admission Time Table 2024-25 - Click Here
■ पहिली प्रवेश फेरी : दि. 14 ते 19 जुलै
■ दुसरी प्रवेश फेरी : दि. 28 जुलै ते 02 ऑगस्ट
■ तिसरी प्रवेश फेरी दि. 10 ते 14 ऑगस्ट
■ चौथी प्रवेश फेरी दि. 21 ते 24 ऑगस्ट
■ संस्थास्तरीय समुपदेशन फेरी दि. 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येईल.
■ खाजगी संस्था स्तरावरील प्रवेश २१ जुलैपासून सुरु होणार आहेत.
ITI admission Prospects Download - Click Here
0 Comments