नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत परिपत्रक
राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 (SCF SE 2024) PDF डाउनलोड करा.
पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम टप्प्या-टप्प्यानिहाय राबविणेबाबत GR - Click Here
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्ये विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत शासन परिपत्रक दिनांक ०५/१०/२०१७ अन्वये लागू करण्यात आलेली इयत्ता पहिली ते दहावीसाठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे.
वार्षिक नियोजन PDF इ. 1ली ते 10वी - Click Here
शासन निर्णय दि.१६/०४/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २०२५-२६ पासून टप्प्या टप्प्याने करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सन २०२५-२६ पासून इ.१ली साठीच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शासन निर्णय दि. १७/०६/२०२५ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकान्वये मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा असेल असे नमूद केलेले आहे. त्यास अनुसरुन इयत्ता पहिलीसाठी (नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने) सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. सदर तरतूदी सन. २०२५-२६ पासून लागू असतील.
नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना
मराठी माध्यमाच्या शाळांसाठी विषययोजना
1) मराठी (स्तर-१)
2) इंग्रजी (स्तर-२)
3) ---
4) गणित
5) कलाशिक्षण
6) आरोग्य व शारीरिक शिक्षण
7) कार्यशिक्षण
@ बनी (स्काऊट / गाईड) - ऐच्छिक
वार्षिक नियोजन PDF इ. 1ली ते 10वी - Click Here
कार्यानुभव विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाईल.
बनी (स्काऊट / गाईड) हा उपक्रम शाळांसाठी ऐच्छिक राहील.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी विषययोजना
1) इंग्रजी (स्तर-१)
2) मराठी (स्तर-२)
3) ---
4) गणित
5) कलाशिक्षण
6) आरोग्य व शारीरिक शिक्षण
7) कार्यशिक्षण
@ बनी (स्काऊट / गाईड) - ऐच्छिक
कार्यानुभव विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाईल.
बनी (स्काऊट / गाईड) हा उपक्रम शाळांसाठी ऐच्छिक राहील.
विषयनिहाय तासिका विभागणी व कालावधी
इयत्ता पहिली व दुसरीसाठी वार्षिक दिवस व कालावधीची विभागणी पुढीलप्रमाणे असेल.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ (NCF-FS) व राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ (SCF-FS) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, संदर्भिय शासन निर्णयांना त्याचबरोबर अस्तित्वात असणाऱ्या सूचनांना अनुसरुन सुधारित अभ्यासक्रमासाठी इ.१ली साठी विषय निहाय वेळेचे सुधारित नियोजन लागू करण्यात येत आहे. तसेच एकाच सत्रात भरणाऱ्या शाळा व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांच्यासाठीही वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे. या स्तरासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ (NCF-FS) नुसार वार्षिक ९९० तास अध्ययन होणे या बाबींची पूर्तता होण्यासाठी याप्रमाणे वेळेचे नियोजन लागू करणे आवश्यक आहे.
पहिली, दुसरी साठी विषयनिहाय तासिका विभागणी व कालावधी PDF
नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी शालेय वेळापत्रक
वेळापत्रकाबाबत सूचना
१. सदर निर्देश हे इ.१ली साठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासूनच अंमलात येतील. इ.२री साठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामधील निर्देश बंधनकारक राहतील.
२. इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर होईल. इतर वर्गासाठी त्यांच्या विषयरचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या याआधी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ठेवावी.
३. यासोबत नमुन्यादाखल देण्यात आलेले शाळेसाठीचे साप्ताहिक वेळापत्रक हे एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या क्रमवारीमध्ये व शाळा सुरु करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. परंतु विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही.
४. वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी २ तासिका जोडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तोडी-लेखी-प्रात्यक्षिक-सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे.
५. पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता घेतलेली आहे. केवळ परिपाठ, मधली सुट्टी, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP-Additional Enrichment Period) यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल.
६. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) ह्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे.
७. दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण (AEP) तासिकांसाठी वेळ देता आलेला नाही, अशा शाळांनी शालेय वेळेव्यतिरिक्त / विद्यार्थी विभागणी करून, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत.
८. AEP हो पूरक मार्गदर्शनासाठी असल्याने त्याचा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये करण्यात आलेला नाही तथापि ह्या तासिका साप्ताहिक वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या आहेत.
९. आनंददायी शनिवार मधील उपक्रम, एका सत्रात भरणाऱ्या शाळांना शनिवारच्या दिवशी आणि दोन सत्रात भरणाऱ्या शाळांना शालेय वेळेव्यतिरिक्त घेता येतील.
0 Comments