D. El. Ed. Admission Application 2024-25 | डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन (D.El.Ed) ऑनलाईन प्रवेश अर्ज 2024-25
डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन (D.El.Ed) हा दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य स्तरावर केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जातात. शासकीय कोट्याच्या 70% जागा संबंधित प्रादेशिक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांनी भरल्या आहेत, गुणवत्तेनुसार आणि शिल्लक 30% जागा इतर प्रादेशिक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातून उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार भरल्या आहेत.
Engineering Diploma पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी लिंक - Click Here
D. El. Ed. Full form - Diploma in Elementary Education
डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन 2024-25
शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरणेबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
१. दि. ०३-०६-२०२४ पासून www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरवात होईल.
D. El. Ed. Admission application link 2024-25 - Click Here
all updates on WhatsApp
https://chat.whatsapp.com/FP1EoS4XwWf4V56iMJ1GZA
२. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक आहे.
३. प्रवेश अर्ज शुल्क- खुला संवर्ग रु. २००/-, खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग रु. १००/- असे राहील.
४. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावे लागेल.
५. प्रवेश अर्ज शुल्क स्वीकारण्याची पद्धती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन/payment gateway/Ewallet स्वतःचे किंवा नातेवाईकांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारेच स्वीकारले जाईल.
६. प्रवेश पात्रता प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज, विज्ञान व एम.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवार इ. १२ वी खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
७. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.
८. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वतःच्या registered ई-मेलवरून support@deledadmission.in या ई-मेलवर पाठवाव्यात. केले जाईल.
९. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध याबाबतचे वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नाही. त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.
0 Comments