SHE - Box Web Portal - कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार समितीची नोंद SHE-BOX या ऑनलाईन पोर्टलवर करणेबाबत आणि कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम, २०१३ (POSH ACT-२०१३) ची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत परिपत्रक
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मकचौ-२०१३/प्र.क्र. ६३/मकक, दि. १९/०६/२०१४ अन्वये नमुद केल्यानुसार कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा जजमेंटमधील मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतर्गत तक्रार समिती गठित करणेबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्त सर्व कार्यालयात विशाखा जजमेंटमधील मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याबाबत सूचित केले आहे.
शिक्षण आयुक्तालयाचे संदर्भ क्रमांक १ वरील पत्रान्वये शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी अंतर्गत तक्रार समितीची नोंद https://shebox.wcd.gov.in/signin लिंक द्वारे ऑनलाईन पोर्टलवर करणेबाबत विनंती करण्यात आली आहे परंतु अद्याप कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे.
प्रत्येक कार्यालयातील गठित करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार समितीची नोंद ही SHEBOX या ऑनलाईन पोर्टलवर करणे अनिवार्य आहे.
SHEBOX Web Portal
https://shebox.wcd.gov.in/
महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे उपरोक्त संदर्भ क्रमांक २ वरील पत्रान्वये सदर अधिनियमातील तरतुदीनुसार अंतर्गत समिती (Internal Committee) गठीत केलेली आहे का, याची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने सरकारी व खाजगी आस्थापनांमध्ये पुढील मुद्यांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी-
अ) १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व सरकारी व खाजगी आस्थापनांमध्ये १००% अंतर्गत समित्या स्थापन करुन त्यांची नोंद SHE Box Portal वर करण्यात यावी,
ब) अंतर्गत समितीचे फलक ठळकपणे दिसतील अशा दर्शनी भागात लावण्यात यावेत.
क) शासकीय आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन झालेल्या समितीच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
ड) आपले अधिनस्त आस्थापनांमध्ये POSH Act-२०१३ अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये प्रचार, प्रसिध्दी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत व त्यांची नोंद SHE Box Portal वर करण्यात यावी.










0 Comments