Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद माहेवार नियोजन | शिक्षण परिषद तासिका नियोजन | शिक्षण परिषद सुधारित मार्गदर्शिका PDF

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद माहेवार नियोजन |शिक्षण परिषद तासिका नियोजन | शिक्षण परिषद सुधारित मार्गदर्शिका PDF



राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदा आयोजित करण्यात येतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये केंद्रातील शिक्षक राबवत असलेले विविध उपक्रम, अध्ययन अनुभव समजून घेणे, अनुभवांचे आदानप्रदान करणे, एकत्र येऊन शिक्षकांना जाणवणाऱ्या समस्या चर्चेद्वारे सोडवणे, क्षमता आधारित वर्ग-नियोजन करणे, केंद्र संसाधन गटाचे मार्गदर्शन यातून शिक्षकांची क्षमता बांधणी होते.


प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास चालना देणे तसेच वर्ग अध्यापन अधिक परिणामकारक व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. 

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांद्वारे निपुण भारत अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN), क्षमता आधारित शिक्षण, बहुवर्ग अध्यापन कौशल्ये आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा, मुलांच्या शिकण्यामध्ये पालकांचा सक्रीय सहभाग या बाबींवर विशेष भर देण्यात यावा. संदर्भ क्र. १ अन्वये समूह साधन केंद्रस्तरावर दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करणे अनिवार्य आहे. तसेच संदर्भ क्र. ३ अन्वये परिषदेमध्ये शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील. तसेच, त्यांची विद्या समीक्षा केंद्र पोर्टल / App वर समूह साधन केंद्र समन्वयक यांचे द्वारे उपस्थिती नोंदविली जाईल. शिक्षण परिषदेत ठरलेल्या गोष्टींची प्रत्यक्ष वर्गातील अंमलबजावणी बाबत समूह साधन केंद्र समन्वयकांनी शाळाभेटी दरम्यान पडताळणी करावी.


वर्षातील दरमहाच्या शिक्षण परिषदेतील एकूण ४० (१० शिक्षण परिषद x ४ तास) तासिकांना उपस्थितीसाठी जास्तीत जास्त १० घड्याळी तासिका ५० तासांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यासाठी गृहीत धरल्या जातील. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांचे आयोजन पुढील पाच सत्रांमध्ये करण्यात यावे. या आराखड्यानुसार केंद्र संसाधन गटाने (CRG) स्थानिक शैक्षणिक गरजा व प्राधान्यांचा विचार करून केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचे आयोजन करावे.


शिक्षण परिषद सत्र नियोजन

केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेत सत्र आयोजन करताना पुढील बाबींचा समावेश करावा.

शिक्षण परिषद सत्र तासिका नियोजन PDF 



केंद्र स्तरीय शिक्षण परिषद माहेवार विषय नियोजन PDF 



शिक्षण परिषदेसाठी उपरोक्त विषय मार्गदर्शक असून केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संरचनात्मक, गुणवत्तापूर्ण व अधिकाधिक फलदायी होण्यासाठी दिलेले आहेत. यांव्यतिरिक्त स्थानिक गरजेनुसार व शैक्षणिक प्राधान्यानुसार संबंधित केंद्रस्तरावर आवश्यक पूरक विषयांचाही समावेश करावा. शिक्षण परिषदांमध्ये विषयानुरूप चर्चा, अध्ययन अध्यापनातील अडचणी सोडविणेसाठी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण, उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण तसेच वर्गनिहाय व विषयनिहाय मासिक वर्गनियोजन करण्यात यावे.

शिक्षण परिषदेसाठीचे आयोजन व नियोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची राहील. तसेच विषयांचे तज्ञत्व व मार्गदर्शनाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची राहील. सदर नियोजनानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांचे प्रभावी नियोजन व संदर्भीय शासन परिपत्रकातील निर्देशानुसार आयोजन करण्यात यावे. शिक्षण परिषदेची सुधारित मार्गदर्शिका विकसित केली असून कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.


केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सुधारित मार्गदर्शिका PDF - Click Here 

दरमहा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करणेबाबत शासन परिपत्रक - Click Here 



Post a Comment

0 Comments

close