*आरोग्यदायी मुळा*
मुळ्याची भाजी थंडीत मोठ्याप्रमाणात बाजारात उपलब्ध होते. ही भाजी नियमित सेवन करणे आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. मुळ्याच्या भाजीचे मुळ हे पांढऱ्या रंगाचे आणि जाडजुड असते. याची भाजी केली जाते. तसेच सलाडमध्येही याचे सेवन केले जाते. ही एक भाजी असली तरी तिच्यात मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. मुळ्याला पोटासाठी आणि लिवरसाठी नॅच्युरल प्युरिफायर मानले जाते. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
मुळा सेवन करण्याचे कोणते फायदे आहेत
*जाणून घेवूयात*
100 ग्रॅम मुळ्यात हे असते
✅18 ग्रॅम कॅलरी
✅ 0.1 ग्रॅम फॅट
✅4.1 ग्रॅम कार्बोहायड्रेट
✅1.6 ग्रॅम डायट्री फायबर
✅2.5 ग्रॅम शुगर
✅0.6 ग्रॅम प्रोटीन
✅36 टक्के व्हिटॅमिन सी
✅ 2 टक्के कॅल्शिअम
✅2 टक्के आयर्न
✅ 4 टक्के मॅग्नेशिअम
*हे आहेत फायदे*
*1) लिव्हर*
लिव्हरची क्रिया चांगली होते. लिव्हरचा त्रास झाल्यास नियमीतपणे मुळ्याचे सेवन करावे. कावीळ झाल्यास नियमीत मुळा खावा.
*2) ब्लड प्रेशर*
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतो. शरीरातील सोडियम-पोटॅशिअमचा स्तर बॅलन्स ठेवतो आणि याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
*3) शरीराची स्वच्छता*
मुळा किडनीचे आरोग्य चांगले ठेवतो. शरीरातील विषारी तत्व बाहेर काढतो. यातील फायबरमुळे पोटाचे सर्व आजार बरे होण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली होते. भूक वाढते.
*4) पचनक्रिया*
मुळ्याच्या रसामुळे पोटाचे वेगवेगळे आजार दूर होतात. तुम्हाला पोटात जडपणा वाटत असेल तर मुळ्याच्या रस थोडे मीठ घालून प्यावे. मुळ्याचे अनेक फायदे असले तर ज्यांना वाताची समस्या असते त्यांनी मुळा खाऊ नये कारण मुळ्याने वात वाढतो.
0 Comments