म. टा. प्रतिनिधी, नागपूर
नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये कार्यरत अतिरिक्त शिक्षकांचे वेतन पुन्हा जुन्याच शाळेतून सुरू केले जाणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत. या आदेशांमुळे अतिरिक्त ठरलेल्या अनेक शिक्षकांना वेतनाच्या संदर्भात दिलासा मिळणार आहे
शैक्षणिक सत्र २०१७-१८ ची संचमान्यता शासनाने जाहीर केली होती. या संचमान्यतेनुसार, शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते. या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांसाठी २६ व २७ नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात समायोजनाची प्रक्रियादेखील आयोजित करण्यात आली होती. समायोजन झालेल्या शिक्षकांना प्रशासनाने तसे आदेशही दिले होते. ज्या शिक्षकांना समायोजनाचे आदेश प्राप्त झाले होते अशा शिक्षकांना जुन्या शाळांमधून कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, या कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांना नवीन शाळेत रूजू करून घेण्यात आलेले नाही. जुन्या आणि नव्या अशा दोन्ही शाळांमध्ये नसल्याने अशा शिक्षकांची मोठी अडचण झाली आहे.
अशा शिक्षकांचे वेतन हे जुन्या शाळांमधून काढण्यात येऊ नये, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी या आधी दिल्या होत्या. या आदेशांमुळे असे सगळे शिक्षक हे दुहेरी कात्रीत सापडले होते. शिक्षकांचा कोणताही दोष नसताना त्यांना वेतनापासून वंचित करू नये. जोपर्यंत नवीन शाळा अशा शिक्षकांना रूजू करून घेत नाही, तोपर्यंत त्यांना जुन्याच शाळेत कार्यरत राहण्याचे आदेश द्यावे. अतिरिक्त ठरलेल्या सर्व शिक्षकांचे वेतन जुन्याच शाळेतून अदा केले जावे, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघाने केली होती. माध्यमिक शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे यांनी यासंदर्भात आता आदेश दिले आहेत. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना जुन्याच शाळेतून वेतन देण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


1 Comments
दहावी वीस गुण येणार का परत समिती स्थापन केलती.
ReplyDelete