Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आठवणींच्या मंद आचेवर मनाच दूध.... - कोजागिरी शुभेच्छा संदेश

🌹💐🙏🏻 


कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात

सौख्य, मांगल्य, समृद्धी

आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो !

कोजागिरी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!



मंद प्रकाश चंद्राचा

त्यात गोड स्वाद दुधाचा

विश्वास वाढू द्या नात्यांचा

त्यात गोडवा असू दे साखरेचा

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


विझवून आज रात्री 
कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा 
तो चंद्रमा पहा रे

असतो नभात रोज 
तो एकटाच रात्री 
पण आजच्या निशेला 
त्याच्या सवे रहा रे

चषकातुनी दुधाच्या 
प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही 
कोजागिरी करा रे

कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...😊




      *_कोजागिरी..._*     

 *आठवणींच्या मंद आचेवर मनाच दूध आटवायला ठेवाव. नकोशा आठवणींच पाणी मग वाफ होवुन जातच !!*
 *हळु हळु  जमलेली संस्काराची साय विरघळु लागली की त्यात नात्यांची वेलची अन आपुलकीचे केशर घालाव.*
 *वात्सल्याची साखर गरजेपुरती घातली की मनाला ऋणानुबंधांचा छान रंग चढेल.*
 *मनभर पसरलेल्या विश्वासाला चांदणस्पर्श झाला की मनातली कोजागिरी साजरी झालीच म्हणुन समजा !!!* ✍🏻

*_कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्छा!!!_*





कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते

दूधात देखणे रूप चंद्राचे दिसते

शरद पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!




प्रकाश चंद्राचा आस्वाद मसाले दुधाचा

आनंदाने साजरा करु, सण कोजागिरीचा

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!


🌹💐💐🥛🥛💐💐🌹

Post a Comment

0 Comments

close