Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा | NTS Exam | सर्वसाधारण माहिती - योजनेचे उद्दिष्ट, निवडपद्धती, परीक्षेचे स्वरूप, माध्यम, मूल्यमापन, आरक्षण विषयी माहिती.

योजनेचे उद्दिष्ट :- इयत्ता १० वीच्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी, ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

निवडपध्दती :- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत २०१२-१३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी दोन स्तरावर घेण्यात येते. 

अ) राज्यस्तर ब) राष्ट्रीयस्तर 

अ) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (राज्यस्तरीय) 

१) पात्रता : 
a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी/विद्यार्थीनीस राज्यस्तर परीक्षेस बसता येते. त्यासाठी वयाची, उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही. तसेच कोणतीही पूर्व परीक्षा देण्याची अट नाही. b) ओपन डीस्टन्स लर्निंग (ODL) स्कूल योजनेखाली नोंदविलेले खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र ठरतात. 

• १ जुलै २०२० रोजी ज्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे. 
• जे नोकरी करीत नाहीत. 
• जे इ. १० वी च्या परीक्षेला पहिल्यांदाच बसत आहेत. 

2 ) अर्ज करण्याची पध्दत:- खालील वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या www.mscepune.inhttp://nts.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र, केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्गातील (OBC) विद्यार्थ्यांची Non-creamy layer प्रमाणपत्र, EWS (Economically Weaker Section) प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही. तसेच ऑनलाईन भरलेल्या विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रात काही दुरुस्ती असल्यास सदरची दुरुस्ती दि. १० नोव्हेंबर २०२० पर्यंत करता येईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची असेल. सविस्तर माहिती परिषदेच्या www.mscepune.inhttp://nts.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

3) शुल्क :- राज्यस्तर परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते. शाळा संल्लग्नता शुल्क 200 रु. परीक्षा शुल्क 150 रु. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
Latest Update


4) परीक्षेचे विषय-

अ) पेपर -१ला :- बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) 

ही मानसशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित १०० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. (एकूण १०० गुण) 
बौद्धिक क्षमता चाचणी MAT या पेपरची प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

ब) पेपर - २ रा :- शालेय क्षमता चाचणी 

ही सामान्यत: ९ वी व १० वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १) सामान्य विज्ञान २) समाजशास्त्र ३) गणित असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण १०० प्रश्न सोडवायचे असतात. 

सामान्यविज्ञान ४० गुण + समाज शास्त्र ४० गुण + गणित व भूमिती २० गुण = एकूण १०० गुण  उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. a) सामान्य विज्ञान ४० गुण :- भौतिकशास्त्र १३ गुण, रसायनशास्त्र १३ गुण व जीवशास्त्र १४ गुण. b) सामाजिक शास्त्र ४० गुण :- इतिहास १६ गुण, राज्यशास्त्र ०८ गुण व भूगोल १६ गुण. 

c) गणित २० गुण :- बिजगणित १० गुण व भूमिती १० गुण..

शालेय क्षमता चाचणी SAT या पेपरची प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

NTS Exam प्रश्नपत्रिका संच | NTSE Exam Question papers




5) माध्यम:- प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दु, कन्नड व तेलुगू या सात माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. प्रश्नपत्रिकेत काही शंका निर्माण झाल्यास इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका मूळ प्रत म्हणून पहावी. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ काळे/निळे बॉलपेपने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली व अपुरी वर्तुळ गोल केलेले उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली उत्तरे, व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

6) परीक्षेचे मूल्यमापन:- विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने करण्यात येते. खबरदारीचे सर्व उपाय योजून बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. गत वर्षी राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी NCERT नवी दिल्ली यांचेकडून महाराष्ट्रासाठी एकूण ७७४ एवढा कोटा देण्यात आलेला होता. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अवलंब राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी केला जात नाही.

7) गुणपडताळणी:- सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येते तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येते त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या स्वत:च्या गुणांची गणना करु शकतात.

8) आरक्षण :- अनुसूचित जातींसाठी (SC) १५% शिष्यवृत्त्या, अनुसूचित जमातींसाठी (ST) ७.५% शिष्यवृत्त्या, http://www.ncbc.nic.in/user_panel/centralliststateview.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार (Non-creamy layer) इतर मागास संवर्गासाठी (OBC) २७% शिष्यवृत्त्या आणि EWS (Economically Weaker Section) घटकातील विद्यार्थ्यांसाठी १०% शिष्यवृत्त्या राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच दिव्यांगांसाठी ४% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे. (a), (b), and (c) प्रत्येकी १% आरक्षण व (d), (e) या साठी १% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू

Post a Comment

0 Comments

close